बरबडा :-किरण हणमंते : -
बरबडा जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे श्रीमती कलावतीबाई गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांचे ४ थे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे शाळेचे जेष्ठ संचालक तथा माजी प्राचार्य अध्यक्ष व्हि. टि .सुरेवाड, शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, संचालक देविदास नेरलेवाड, इरन्ना कंडापल्ले,उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सुर्यकांत फड, प्रा. वसंत शिंदे, अविनाश धर्माधिकारी, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी इत्यादी जणांची उपस्थिती होती
-------------------------------------------------------------------
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी यांचे चिरंजीव प्रा.सुदर्शन धर्माधिकारी यांची कन्या संयोगीता उर्फ रावी यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू कुटुंबातील मुलींना त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीस मुलींना सायकली वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे
श्रीमती कलावतीबाई धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण या दिवशी त्या सर्व तीस मुलींना सायकल वाटप सर्व मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शाळेत शिकत असणाऱ्या पण बाहेरगावाहुन येणाऱ्या मुलींना सायकल देऊन एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला असल्याचे बोलल्या जात आहे. असे उपक्रम समोर ही राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मातोश्री कलावतीबाई धर्माधिकारी यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांचे भाषणे झाली त्यामध्ये प्रास्ताविक उपमुख्याध्यापक गणेश बडूरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शिवाजी हंबर्डे यांनी केले.

0 Comments