Header Ads Widget

कृष्णूरच्या जय भवानी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी राणी सुधाकर राठोड हिची विभागीय पातळीवर निवड !!

    
       माधव पवार
नायगाव तालुक्यातील जय भवानी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज कृष्णुरची विद्यार्थिनी कु. राणी सुधाकर राठोड हिने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील १०० मीटर धावणे आणि २०० मीटर धावणे या मैदानी क्रीडा प्रकारातील दोन इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहेसदरची विध्यार्थीनी दोन्ही इव्हेंट मध्ये विभागीय पातळीवर तिची निवड झाली असल्यामुळे विद्यालयाचे विद्यामान मुख्याध्यापक मठपती यांच्यासह शिक्षककानी  विद्यार्थिनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहेतालुक्यातील जय भवानी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज कृष्णुरची विद्यार्थिनी कु. राणी सुधाकर राठोड हिला 
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ.कांजाळकर मॅडम यांचे गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय राजेश देशमुख कुंटूरकर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नागनाथ मठपती यांनी सुद्धा कौतुक केले आहे

कृष्णूच्या जय भवानी विद्यालयातील मुख्याध्यापक मठपती यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने यशवंत विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचे खूप खूप अभिनंदन आणि विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी अनंत शुभेच्छा दिल्या आहे 

Post a Comment

0 Comments