Header Ads Widget

जवाहरलाल नेहरू विद्यालय संघ कबड्डी व खो खो आणि क्रिकेट मध्ये प्रथम क्रमांक



बरबडा :-किरण हणमंते :- 

नायगाव येथे होत असलेल्या तालुकास्तरीय खो-खो, व कबड्डी स्पर्धेत  जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील खो-खो, स्पर्धेत १४,१७,१९ वर्ष वयोगटातील मुलांची टीम खो-खो स्पर्धेत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम तर १९ वर्ष वयोगटातील मुलांची टीम कबड्डी स्पर्धेत प्रथम अनुक्रमे आलेले आहेत
मुलामध्ये त्यामध्ये चौदा वर्षाखालील मुली कब्बड्डी आणि खो खो मध्ये प्रथम, सतरा वर्षाखालील मुली खो खो मध्ये  प्रथम क्रमांक पटकविला आहे या स्पर्धा कुंटूर तांडा येथे झाल्या होत्या

तसेच दिनांक नायगाव येथे झालेल्या मुलांच्या स्पर्धे मध्ये अनुक्रमे चौदा, सतरा, एकोणवीस वर्षाखालील मुले खो खो या स्पर्धेत सर्व प्रथम आले आहेत तर एकोणवीस वर्षाखालील मुले कब्बड्डी स्पर्धेत सर्व प्रथम आले आहेत. याचे मार्गदर्शक कैलास पवार, माधव कंडापल्ले, सोनटक्के सर तर पंच म्हणुन पवार, मठपती, बैस, बेळगे, आयुब सय्यद यांनी काम पाहिले आहेत.आता पर्यंत या शाळेने यशाची परंपरा राखत अदभूत यश मिळवले आहेत आणि तसेच वयक्तिक कुस्ती स्पर्धेत पण प्रत्येक गटातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील क्रिकेट संघाने नायगाव येथे होत असलेल्या १९ वर्ष ‌वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ‌ प्रथम क्रमांक पटकावला आहे. या क्रिकेट टीमचे व क्रीडा शिक्षक कैलास पवार यांच्या मार्गदर्शनामुळे व मेहनती मुळे तसेच खेळाडू मुळे  हि टीम प्रथम आली आहे.

या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, उपमुख्याध्यापक गणेश बडूरे सर, पर्यवेक्षक सुर्यकांत फड सर, ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक वसंत शिंदे सर यांनी सर्व टिमचे व क्रीडा शिक्षक कैलास पवार सर, माधव कंडापल्ले सर, सोनटक्के सर  यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments