Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी निवडणूक विभागासह पोलीस प्रशासन सज्ज !!

 

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी निवडणूक विभागासह पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती मिळाली असून दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदार होणार असल्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच धुमाकूळ घातला असल्याचे ग्रामीण भागात दिसून आले आणि दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी सदरील उमेदवाराचे भवितव्य जनते समोर दिसणार आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणूका अटी तटीच्या होत असल्यामुळे सर्वात जास्त आंतरगावची ग्रामपंचायत निवडणूक विधानसभा निवडणूकी सारखी होताना दिसून येत असल्यामुळे सर्वच राजकीय पुढाऱ्याचे लक्ष आंतरगावाकडे लागले आहे
सदरच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या राजकीय पुढाऱ्याचे लक्ष केंद्रित झाले असल्याचे जनतेतून बोलल्या जात असून सर्वात सरळ आणि सोप्या पद्धतीने रुई खुर्दची निवडणूक पाच उमेदवार बिनविरोध व सरपंच पदाचे दावेदार यांनी विरोधी गटाला जाहीर पाठींबा दिल्यामुळे गावात शांततेचे वातावरण आहे
-------------------------------------------------------------------
आठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागासह पोलीस प्रशासन एकदम सज्ज असल्याचे वास्तव चित्र पाहवयास मिळत आहे

सदरच्या निवडणुका आंतरगाव, सातेगाव, रुई खुर्द, पिंपळगाव, सुजलेगाव, मरवाळी, ताकबीड, तलबीड गंगनबीड या गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुका असल्यामुळे मतदारानी मतदान करीत असताना नोटाच्या बटनाकडे लक्ष न देता आपल्या अचूक उमेदवाराला मतदान करावे असे जनतेतून बोलल्या जात असून नोटामुळे नक्की धोका होऊ शकतो ले मात्र लक्षात ठेवण्याची गरज आहे 

Post a Comment

0 Comments