Header Ads Widget

कमी निधीत दर्जेदार काम तेरा कोटीचा फुसका बार घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याच्या कामाची गती गुत्तेदारानी वाढवली


      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याच्या कामाला गुत्तेदाराने चांगलीच गती लावल्यामुळे सदरचे काम गतिमान चालत असल्यामुळे सदरचा रस्ता हा जनतेसाठी व वाहतुकीसाठी सुरळीत होईल असी अपेक्षा जनतेने व्यक्त केली असून रस्त्याचे काम करत असलेले गुत्तेदार टेंभुर्णीकर यांनी जोरदार कामाला सुरुवात केली असल्याने सध्याच्या परिस्थितीत रस्त्याची दुबई केली जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता हा गेल्या अनेक वर्षा पासून बेवारस बनला होता या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यासह राजकीय पुढाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्याची बेहाल झाली होती
------------------------------------------------------------------
या रस्त्यासाठी तेरा कोठी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते परंतु सध्याच्या परिस्थितीत खड्डे बुजवण्याचे काम मंजूर करण्यात आले असल्याने गुत्तेदार टेंभुर्णीकर यांनी कमी निधीत दर्जेदार रस्ता बनवित असल्यामुळे जनतेसाठी दिलासादायक बाब असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असून सदरच्या गुत्तेदाराने संपूर्ण यंत्रणा कामाला या रस्त्यावर कामाला लावली आहे
घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता हा पूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे होता गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात अल्यामुळे सदरच्या रस्त्याची विल्हेवाट अधिकाऱ्यानी लावली सदरील रस्त्यावर वाहन तर सोडाच परंतु जनसामाने माणसाला जाणे सुद्धा मुश्किल बनले होते

सध्याच्या परिस्थितीत सदरचा रस्ता हा जेसीपीच्या साह्याने खोदून त्यांची दुबई केली जात असल्याने त्यावर गिट्टी व मुरूम आणि टँकरने पाणी टाकून दबाई करत असल्यामुळे थोडक्यात सदरचा रस्ता मजबूत होत आहे 


Post a Comment

0 Comments