नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
कलयुग हि दोषांची खाण आहे कलयुगा पासुन दुर रहाण्यासाठी माणसाने संयमीत जीवन जगले पाहिजे परंतु स्वैराचारी होवुन लोकं अधर्म करतांना दिसत आमच्या संताची ऋषीमुनींचे विचार समाजाला पोषक आहेत चिंतन केल्याने आमचा आचार विचार व संचार चांगला होतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. भागवत श्रवण केल्याने आम्हाला खरा धर्म कळतो. माणसाने माणसाशी मानसाप्रमाणे वागावे याचे ज्ञान होते.
-------------------------------------------------------------------
गेल्या सहा दिवसा पासुन श्री क्षेत्र राहेर येथे सर्व गावकरि व तरुण मंडळीच्या सहकार्याने आत्मकल्यान हेतुने गेल्या पंधरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे आणी या सप्ताहात या वर्षी परम भाग्याने ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांच्या अमृतवाणीतुन श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्याचा महान योग जुळून आला आहे. ----------------------------------------------------------------
माणुस कोणत्या जातीत जन्माला या पेक्षा कोणत्या मातीत जन्मला जाती पेक्षा माती महत्वाची आहे असे ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांनी प्रभोदन के पुढे बोलतांना महाराज म्हणाले की तिर्थ यात्रा देवदर्शन करा कींवा नका करु पण आईवडिलांची सेवा करा त्यांच्या पावन चरणात चारधाम यात्रेचे दर्शन होते ज्या घरात थोरामोठ्यांचा अपमान होतो तिथुन अधर्माची सुरवात होते असे अनेक दाखले देऊन आष्टीकर महाराजांनी सर्वांची मने जिंकली.
------------------------------------------------------------------ महाराजांसोबत संगीताची अतिशय सुंदर साथ श्रीनिवास कुलकर्णी. मनोज धर्माधिकारी. दिपक गोरे माऊली महाराज करत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कथेतील पात्राचे जीवंत देखावे झाकीच्या रूपाने ह भ प भरत महाराज उपाध्ये हे दाखवत आहेत.
-------------------------------------------------------------------
सर्व गावकरी नरवाडे परिवार, हिवराळे परिवार ,कोळी समाज, ब्राह्मण परिवार सर्व समाज मिळून समाजिक एकतेचे स्वरुप सप्हाच्या रुपाने दिसत आहे. आज खर्या अर्थाने समता कशी असते हे राहेर वासीयांनी दाखवून दिले.सात दिवस चालेल्या कथेचा समारोप सोमवारी करण्यात येणार आहे. समारोप प्रसंगी कथाकार आष्टीकर महाराज यांची रथात बसून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

0 Comments