Header Ads Widget

नायगाव मधील आठ ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेमतदानाच्या पूर्व संध्येला पिंपळगाव येथे हानामारी एक गंबीर तर काही जखमी आणि आंतरगावच्या मतदान केंद्रावर सपोनि महादेव पुरी यांच्या कडक भूमिकेमुळे मतदान सुरळीत -



बाळासाहेब पांडे / माधव पवार -

नायगाव तालुक्यातील सुजलेगाव, पिंपळगाव,  तलबीड, अंतरगाव, रुई (खुर्द) मारवाळी, कोपरा,  सातेगाव, या आठ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८डिसेंबर रोजी मतदान शांततेत पार पडले असून २५  बूथ,  ४ क्षेत्रीय अधिकारी, १०० च्यावर कर्मचारी, आणि  पोलीस कर्मचारी यांचा फौज फाट्यासह झालेले मतदान ८२.८६ टके झाल्याची माहिती नायगाव तहसील चे निवडणुक निर्वाचन अधिकारी गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे 
नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २४ उमेदवार आपले नशीब आजमावले आहे तर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या ६६ जगातून ७ जागा बिनविरोध निघाल्या आहेत त्यात रुई खुर्द येथील ५:तर तलबीड मधील दोन जागा बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. या दोन ग्रामपंचायती पूर्वीच यशस्वी झाल्याने आता उर्वरित ५९ जगासाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले होते त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी नायगाव चे तहसिलदार तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी  गजानन शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिये चे कडेकोट नियोजन केल्याने व तिन्ही ही पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावल्याने मतदान शांततेत पार पडले
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्या साठी नायब तहसीलदार लोंढे ,रोशनसिंग ग्रंथी,आलमवाड,यनुस, साईनाथ भंडारे या सह महसूल कर्मचारी निवडणूक कर्मचारी व पोलीस बांधव यांनी प्रयत्न केले

"आंतरगाव येथील मतदार केंद्रा वरील मतदान शांततेत "
----------------------------------------------------------------
पिपंळगाव येथे हाणामारी माजी सरपंच कदम गंभीर जखमी - 

पिंपळगाव येथे मतदानाच्या पूर्व संध्येला हाणामारी झाली असून येथे माजी सरपंच किरण कदम विरुद्ध म्हैसाजी कदम या भाऊबंधा मध्येच निवडणुकीची रंगत वाढली असून अटीतटीच्या निवडणुकीत माजी सरपंच किरण कदम हे प्रचारा साठी गावात फिरत असताना विरोधी गटाने मारहाण केल्याने डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाले आहेत

नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्याचे कळते.नायगाव पोलिसात तक्रार न आल्याने अद्याप  गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येते 

Post a Comment

0 Comments