Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजची उद्धवराव पतंगे व हरी पाटील इज्जतगावकर यांनी घेतली दखल घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यावर पाण्याचे टँकर चालू -

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर शुगर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे व इतर वाहतुकीमुळे रस्त्यावर वाहनाच्या धुरळ्याने नागरिक हैराण झाले होते या संदर्भात नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी कारखान्याच्या संदर्भात ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्यांची दखल कारखाना प्रशासनातील उद्धवराव पतंगे व हरी पाटील इज्जतगावकर यांनी घेतली असल्यामुळे घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर पाणी टँकरने टाकण्यात येत आहे 
या बातमीची दखल घेऊन कारखाना प्रशासनातील उद्धवराव पतंगे व हरी पाटील इज्जतगावकर याने दखल घेऊन घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यावर पाणी टाकण्यासाठी पाण्याचे टँकर चालू केले आहे
तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखाना राज्यात  मोठ्या दर्जेचा असल्यामुळे या कारखान्याला जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरील ऊस ट्रॅक्टर व ट्रकच्या साह्याने ऊस कारखान्याला घेऊन येतात परंतु कारखाना प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले होते
परंतु सदरील रस्त्यावरील वाहतुकीच्या धुरळ्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आल्याचे ऑनलाईन बातमीत नमूद करण्यात आले होते यांची दखल घेऊन  उद्धवराव पतंगे व हरी पाटील इज्जतगावकर तात्काळ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली असल्याने काही प्रमाणात धुरळा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
कुंटूरकर शुगर कारखाना प्रशासनातील बाळासाहेब पतंगे व हरी पाटील इजतगावकर यांच्याशी संपर्क करून पाणी टाकण्याच्या संदर्भात सूचना केली असता रस्त्यावर सदरील पाणी टाकण्यासाठी पतंगे व डोईफोडे यांनी इकळी मार्गे चालू असलेल्या टँकरला तात्काळ बोलावून घेऊन घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यावर पाणी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली असून सदरच्या रस्त्यावर टँकरने पाणी चालू करण्यात आले असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments