Header Ads Widget

नांदेड येथे मानवहित लोकशाही पक्षाची जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न !!


 
नायगाव : मधुकर जवळे :- 

भारतीय लोकशाहीतील मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली असून येणाऱ्या आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात घेऊन मानव हित लोकशाही ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आली आहे 
लोकशाहीच्या काळातील मानव हित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून महिला व पुरुषाका मोठे मानाचे स्थान मिळत असल्यामुळे या माध्यमातून लोकशाही टिकविण्यासाठी मानव हित लोकशाही हे राज्यात काम करीत आहे
----------------------------------------------------------------------
मानव हित लोकशाही पक्ष बळकटीसाठी सदरच्या कार्यकर्त्यानी एकनिष्टेने काम केले पाहिजे आणि लोकशाही बरोबर मानव हित लोकशाही पक्ष सुद्धा मजबूत झाला पाहिजे हे सर्वानी लक्षात घेऊन काम केले तरच आघामी काळातील निवडणुका सहज जिंकता येतील हे पक्षाचे धोरण आहे 
नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मानव हित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यानी चांगल्या प्रकारे काम करून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी सर्व कार्यकर्त्याना आवाहन करण्यात आले आहे 
-----------------------------------------------------------------------
 यावेळी एम एल पी चे कोअर कमिटीचे अध्यक्ष ॲड टी.एन.कांबळे, कार्याध्यक्ष डॉ.माणिकराव कांबळे, सतिश धनवाडे, जिल्हा अध्यक्ष, मालोजी वाघमारे, किशोर कवडीकर युवक जिल्हाध्यक्ष संजय बोथीकर, जिल्हा महिला अध्यक्ष, युवक आघाडी, तालुका अध्यक्षासह  प्रमुख पदाधिकाऱ्याची विशेष उपस्थित होती 

Post a Comment

0 Comments