नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नागार्जुना पब्लिक स्कूल ने टेबल टेनिस, हँडबॉल, किक बॉक्सिंगसह स्पर्धेत तिहेरी यश संपादन केले असून १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या टेबल टेनिस या खेळात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे
किक बॉक्सिंग मध्येही शाळेच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला नमवून प्रथम क्रमांकासह विजय प्राप्त केला आहे. तसेच हँडबॉलच्या स्पर्धेत १४ वर्षा खालील व १७ वर्षा खालील वयोगटासाठी असलेल्या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवत या शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम ठेवली आहे
-------------------------------------------------------------------
टेबल टेनिस, किक बॉक्सिंग व हँडबॉल या तिन्ही प्रकारच्या खेळातील विजयी स्पर्धकांना विजयाचे प्रतीक म्हणून पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. शैला पवार, संचालक श्री केशव गड्डम, श्रीकांत गड्डम, प्रदीप पवार, सत्यनारायण शिवनी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंना पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले
-------------------------------------------------------------------
या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक अनिल लष्करे, सुहास कांबळे, शुभांगी देशपांडे, गणेश श्रीरामवार व प्रतीक्षा भगत यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन.

0 Comments