विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
मांजरम ता नायगाव येथे दत्त जयंती उस्तवाचे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण हरिपाठ दत्तपंचपदी काकडाभजन कीर्तन महापूजा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
दरवर्षी प्रमाणे मांजरम येथील दत्तमंदिर विठलेशवर मंदिर येथे दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात झाली आहे.मुख्य वाचक वे.शा.स.रमेश महाराज राहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ९ ते १ गुरुचरित्र पारायण होत असून या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक गण घेत आहेत.
सायंकाळी विठलेशवर भजनी मंडळ व इतर भजनी यांच्या वतीने हरिपाठ ,रात्री अनंतराव मंगनाळे, बालू पांडे यांच्या प्रमुख दत्तभक्त मंडळी यांच्या कडून दत्त पंचपदी साजरी होतआहे.सकाळी काकडा,आदी कार्यक्रम होत आहेत.
दि.६ डिसेंबर मंगळवारी रात्री ९ वा.श्री १०८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या हस्ते शिवराज विश्वांभर पो.पा.यांच्या वतीने महापूजा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.दत्त जयंती निमित्त ७ डिसेंबर रोज बुधवार सकाळी ८ वा गुरुचरित्र पारायण सांगता सोहळा १० ते १२ ह.भ.प.भागवताचार्य विषवनाथ उर्फ बाबूं महाराज काकांडीकर याचे दत्त जन्माचे कीर्तन होणार आह
रात्री एकनामी भजनी मंडळ यांचे भजन सादर होणार असून, दि.८ डिसेंबर गुरुवारी सकाळी ८ ते १० वा दतपालखी मिरवणूक मुख्य रस्त्यावरून निघणार आहे.सकाळी १० ते १२ ह.भ.प.विनोद मूर्ती चंद्रकांत महाराज लाठकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्या नंतर काल्याच्या दहीहंडी ने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे

0 Comments