Header Ads Widget

युवा व धडाडीचे कार्यकर्ते संजय बेळगे यांचीनायगाव काँग्रेस ता.अध्यक्ष पदी निवड


विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती धडाडीचे युवा कार्यकर्ते .संजय माधवआप्पा बेळगे यांची नायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी प्रसिद्ध केले असून या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे तर सोशियल मीडिया सह बॅनर बाजीतून बेळगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   
नायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी आतापर्यंत तालुका स्थापने पासून राम पाटील रातोळीकर, रावसाहेब पा.मोरे,बालाजी मदेवाड,मीनाताई कांगठिकर,यांनी पदभार सांभाळला त्या नंतर गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या आठ वर्षा पासून कार्यरत आहेत

विद्यमान संभाजी भिलवंडे यांच्या जागी तरुण तडफदार युवा नेते तथा माजी आ.वसंत चव्हाण व आ.अमर राजूरकर यांचे कटर समर्थक तथा मा.आ.अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी शिक्षण आरोग्य व बांधकाम सभापती संजय आपा बेळगे यांची नुक्तीच काँग्रेस कमिटीच्या  नायगाव तालुका अध्यक्ष पदी निवड केल्याने त्यांच्या वर सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------------------------------------------------------------------ 
संभाजी भिलवंडे हे गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे २०१४ पासून आजतागायत म्हणजे तबबल आठ वर्षे नायगाव ता अध्यक्षपदावर विराजमान होते.त्या पूर्वी २००७ ते १४ युवक काँग्रेस ता.अध्यक्ष होते. माजी आ.वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली भिलवंडे यांच्या कारकिर्दीत नायगाव तालुक्यात पचायत समिती,जि.प.व ग्राम पंचायत सेवा सहकारी सोसायटीवर प्रभुत्व मिळविले होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिलवंडे यांना जिल्हा कार्यकार्यनिवर काम करण्याची संधी मिळणार आहे
-------------------------------------------------------------------
संजय बेळगे हे लिंगायत समाजाचे असल्याने या समाजाला संधी देऊन काँग्रेसने राजकीय समीकरणात लिंगायत समाजाला जवळ करण्याचा योग  साधला आहे.बेळगे हे राजकीय वारसा असलेल्या बेळगे घराण्यातील वारसदार असून नायगावच्या चव्हाण परिवाराशी बेळगे परिवाराचे सलोख्याचे संबध सर्वत्र जाहीर आहेत.
 ----------------------------------------------------------------- 
नायगाव तालुक्यात व शहरात काम करताना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण,आ.अमरभाऊ राजूरकर,माजी मंत्री डी.पी.सावन्त व माजी मंत्री खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी आ.वसंतराव चव्हाण या सह विद्यमान आमदार व काँग्रेसचे जेष्ठ श्रेष्ठ मंडळी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुक्यात काँग्रेसच्या कार्याची काम कसे वाढेल या साठी प्रयत्न करणार असल्याचे दै पुण्यनगरी शी बोलताना बेळगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments