Header Ads Widget

गावा अंतर्गतचे राजकारण बाजूला ठेवून गेल्या सत्तर ते ७५ वर्षाची परंपरा कायम ठेवण्यासाठी रुई येथील गावकऱ्यानी खंडोबारायाच्या यात्रे निमित्त एकत्रित पणे येण्याची गरज !!

     माधव पवार
गेल्या ७० ते ७५ वर्षा पासूनची नायगाव तालुक्यातील मौजे बु येथील खंडोबारायाच्या यात्रेची परंपरा कायम स्वरूपी ठेवण्यासाठी व जंगी कुस्त्या लावण्या करिता गावकऱ्यानी एकत्रित येण्याची गरज असल्यामुळे व सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे खंडोबा रायाची यात्रा साजरी करण्यासाठी एका विचाराची देवाण घेवाण आवश्यक आहे

रुई बु येथील सदरच्या खंडोबा रायाची यात्रा काही दिवसावर आली असल्यामुळे जत्राच्या पटीसाठी व खंडोबारायाच्या यात्रेसाठी आणि कुस्त्या लावण्याच्या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन कुस्त्यासाठी नियोजन करावे अशी मागणी गावातील नागरिकांतून होत आहे
सदरील कुस्त्यांच्या संदर्भात गावकऱ्यांची एकत्रित बैठक आवश्यक असल्याचे ही नागरिकांचे म्हणणे असून तालुक्यातील रुई बु येथे कुस्त्यांच्या पटीसाठी व यात्रेसाठी गावकरी एकत्रित येत नसल्याची चर्चा जोरदार रंगायला लागली असून ती ऐकावयास ही मिळत आहे
सदरच्या समस्त गावकरी मंडळींनी गावांतर्गतचे राजकारण बाजूला ठेवून सार्वजनिक कामासाठी एकत्रितपणे येऊन धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यासाठी एकीचे बळ दाखविने गरजेचे असल्यामुळे व एका विचाराने हनुमान मंदिराच्या पटांगणात उपस्थित राहून खंडोबारायाच्या यात्रे निमित्त विचार विनिमय करण्याची गरज भासत असून समस्त गावकऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून खंडोबा रायाची यात्रा साजरी करण्यासाठी सज्ज राहावे असे हे नागरिकांतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments