Header Ads Widget

रुई बुच्या महिला सरपंचांच्या संकल्पनेतून गावातील गुणवंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याने सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांचे आवाहन !!

     
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील ग्रामपंच्यात कार्यालयाच्या रुई बू. येथील महिला सरपंच सौ प्रिंयकाताई निलेश देशमुख यांच्या संकल्पनेतून गावातील गुणवंतांचा तरुण वर्गाच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले असल्याचे माहिती सरपंच प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले व सेवानिवृत्त कर्मचारी भगवान रामचंद्र चंचलवाद यांचे चिरंजीव दीपक भगवानराव चंचलवाड यांनी मुबंईच्या मंत्रालयात असिस्टंट सचिव पदी नुकतीच नियुक्ती झाली असल्यामुळे त्यांचा सान्मान करण्यासाठी महिला सरपंच सौ प्रिंयकाताई देशमुख यांनी सदरची संकल्पना राबवून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे
---------------------------------------------------------------------
रुई बु येथील सोपानराव गणपतराव पांडे यांची मुलगी सौ. सुप्रिया सोपानराव पांडे ह्या कनिष्ठ अभियंता महावितरण मध्ये नियुक्ती झाल्यामुळे सदरच्या सत्कार सोहळ्यात सकाळी १० ते साडे दहा वाजता सन्मान करण्यात येणार आहे
       
शिक्षक जनार्धन रानबा मंटेवाड यांचे चिरंजीव राहुल व मुलगी राघिणी हे दोनी भाऊ बहीण एम बी बी एसला पात्र ठरल्यामुळे त्याचा सन्मान करण्यात येणार असून 
जेष्ठ शिक्षक मारोती दशरथा पाटील शिंदे यांचा मुलगा  अविनास हा एम बी बी एसला लागला आहे व मुलगी कूमारी आश्विनी ही सॉफ्ट वेअर इंजिनिअर होऊन नोकरीला लागली आहे
---------------------------------------------------------------------
व तसेच दुसरी मुलगी ही डॉ.कु. रेखा ही बी ए एम एस उत्तीर्ण झाल्याबदल यांच्या सत्कार आहे व त्या बदल आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षित केल्याबद्दल श्री मारोती दशरथब पा. शिंदे यांचा सन्मान होणार असल्यामुळे सदर सत्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निलेश देशमुख यांनी केले आहे 
       
महिला सरपंच  सौ. प्रियांकाताई निलेश देशमुख तसेच उपसरपंच प्रतिनिधी दिगंबरराव गंगाराम गोरटकर, संभाजी माधवराव शिंदे,सूर्यकांत शंकरराव पांचाळ डॉ.किशनराव संभाजी पवार, कोंडीबा जळबा दासरवाड विक्रम नागोजी सोनकांबळे यांनी सदरच्या सरपंचांच्या संकल्पनेचे स्वागत केले आहे 

Post a Comment

0 Comments