Header Ads Widget

प्रशासनाच्या विरोधात प्रशासन ग्रामसेवक संघटनेच्या धरणे अंदोलनाची गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी घेतली दखल !!

         
      माधव पवार
दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रशासनाच्या विरोधात प्रशासन म्हणजे ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून आहे आणि संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव पंचायत समितीच्या कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनाची दखल नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामसेवक संघटनेची भेट घेतली व निवेदन स्विकारले आहे
ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्याच्या संदर्भात चर्चा केली संदर्भात ग्रामसेवकाच्या प्रबंधित मागण्याचे निवेदन प्रशासनाकडे पाठवून ग्रामसेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे
-------------------------------------------------------------------
 प्रशासन प्रशासनातील कर्मचाऱ्यावरच करतोय का ?अन्याय -

प्रशासना कडून ग्रामसेवकांवर होत असलेला अन्याय थांबवून या प्रशासनातील सेवकाना शासनाने प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करून न्याय मिळवून द्यावेत अशी मागणी गटविकास अधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे 
-------------------------------------------------------------------
नायगाव पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्रशासनातील ग्रामसेवकांना विविध मागण्याच्या संदर्भात प्रशासनाकडे निवेदन देऊन मागण्या मंजूर करून घ्यावे लागतात तर जन सामान्य माणसाची काय हाल होत असेल या सदरच्या धरणे आंदोलनातून दिसून आले असून प्रशासनाच्या मागण्या प्रशासन मान्य करत नसतील तर जनसामान्य माणसांच्या मागण्या प्रशासन काय मंजूर करतील असा सवाल जनसामान्य माणसातून केला जात आहे
महाराष्ट्र शासन हे प्रशासनातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित ठेवत असतील तर आणि ग्रामसेवक संघटनेवर अशी वेळ येत असेल तर जन सामान्याचे काय ? गेल्या अनेक वर्षापासून ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले परंतु त्यांची अद्याप दखल प्रशासन घेतले नसल्यामुळे ग्रामसेवक संघटनेला  पंचायत समितीच्या कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याची वेळ ग्रामसेवक संघटनेवर आली आहे 

Post a Comment

0 Comments