Header Ads Widget

हिमायतनगर शहरात श्रद्धा वालकर प्रकरणी भव्य निषेध मोर्चा काढून श्रद्धांजली अर्पण शहरातील हजारो महिला ,मुलींसह नागरिकांचा उस्फूर्त सहभाग !! -

 
हिमायतनगर : नागोराव शिंदे  :  --

शहरातील सकल हिंदू समाज बांधवांनी लव्ह जिहाद विरोधात आज दि २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी  ११ वाजता श्री परमेश्वर मंदिर येथून विराट निषेध मूक मोर्चा काढण्यात आला असून त्यात धर्मातर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा अशी मागणी हिंदू संघटनाकडून करण्यात आली असून श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी आफताबला फासावर लटकवण्याची मागणी शहरातील विविध संघटनांनी यावेळी  तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे त्याचा सर्व राजकीय पक्ष, संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे

याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील सकल हिंदू समाजाकडून एक विराट निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यात शहरातील सर्व महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्पुर्तीने सहभाग घेऊन हजारोंच्या संख्येने जमलेला जन समुदायाच्या माध्यमातून मोर्चाला सुरवात करण्यात आली असून त्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंजली ठाकरे,गजानन चायल, माधुरी तिपनवार मॅडम यांनी असे सांगितले की आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हीचे ३५'तुकडे करत निर्घुण पणे तिची हत्या केली
 या घटनेने युवतींमध्ये चागलीच दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीतच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी हिमायतनगर येथील सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यात शहरातील महिलां मुली सह पदाधिकारी, मोर्चात सहभागी झाले
-------------------------------------------------------------------
मोर्चा मार्गात पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त...

श्रद्धा वालकर प्रकरणात सर्व तालुका निहाय मोर्चे निघत असल्याने आज दि २८  नोव्हेंबर २०२२  रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथून निघालेला हा मोर्चा एकदम विराट मोर्चा होता त्यामुळे शहरासह किनवट येथील  हिंदुत्ववादी संघटनांनी ह्यात सहभाग घेतला असून ह्याचे निवेदन हिमायतनगर तहसील व पोलीस प्रशासनास देण्यात आले होते त्यात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी असल्याने शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करून शहरातील निषेध मुक मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने हा मोर्चा शांततेत पार पडला आहे
-------------------------------------------------------------------
यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यामध्ये ३६ गुण जुळतील म्हणून ती त्याच्यासोबत गेली, पण जाता जाता स्वतःच्या आयुष्याचे 36 तुकडे करून गेली, आपल्या आयुष्यात एखादा आफताब येऊन आपली श्रद्धा होईल एवढं प्रेमाच्या आहारी जाण योग्य नाही', अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसत आहेत.या विराट हिंदू निषेध मूक मोर्चाच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आलीदिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व १३'नोव्हेंबर रोजी संभाजीनगर सिल्लेखाना चौकात सय्यद अकबर या रिक्षावाल्याने एका मुलीची छेड काढली तेव्हा त्या मुलीने रिक्षातून उडी घेतली ती मुलगी आज हॉस्पिटल मध्ये आहे - 

त्या नराधमावर सुद्धा कठोर कारवाई करावी अशा आशयाच्या मागण्याचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या महिला ,युवती व संघटने कडून एक विराट निषेध मोर्चा काढून हिमायतनगर येथील तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी शहरातील सर्व सकल हिंदू समाज बांधव महिला व मुली सह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे असंख्य स्वयंसेवक व विविध पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments