Header Ads Widget

असा एक काळ आणि क्षण असतो की कुत्र्याना सुद्धा ग्रामीण भागात केला जातो गळ्यत झेंडूच्या फुलाचा हर सन्मान !!


      माधव पवार
ग्रामीण भागातील नागरिक दर वर्षी विविध पद्धतीने व पारंपारिक पद्धतीने मोठया उत्साहाने साजरा करतात यात गुडी पाडवा असो की सिमगा धुलीवदंन असो दसरा असो दिवाळीचा सण असो अथवा षटीचा सण असो अशा प्रकारे विविध स्वरूपात साजरा करण्यात येत आहे
महिला पुरुषासह लहान मुले ही तलीन असतात असाच एक सण आणि क्षण असा येतो की खेड्यापाखेड्यात सठीच्या सणा निमित्त कुत्रा कसा ही रंगाने असो त्यांना दैवत म्हणून त्यांची पूजा व भंडार त्यांच्या अंगावर टाकून व गळ्यात झेंडूच्या फुलाचा हर घालून सन्मान करतात हे पारंपारीक पद्धत ग्रामीण भागात पाहण्यासाठी मिळाले असून कुत्र्याला शोधून त्यांच्या गळ्यात हर घालण्याt आले आहेत
नायगाव तालुक्यातील व खेड्यापाड्यात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२  रोजी सतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना यावेळी तळी उचलण्यासाठी वाघ्याची मोठी धावपळ झाली जय मल्हार येळकोट येळकोट घे असे म्हणत तळी ची पूजा करून तळी उचलण्यात आली आहे

सदरची परंपरा अनेक वर्षापासून चालत असल्याने कुत्र्यांना सुद्धा सठीच्या सणा निमित्त मोठा भाव आला गावठी कुत्र्याच्या गळ्यात फुलांचे हार घालून त्यांची पूजा करण्यात आली ही परंपरा सदरची आज पर्यंत होत आली पुढे चालूही राहणार असल्याचे वाघे मंडळीतून सांगण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments