बरबडा :-किरण हणमंते :-
बरबडा येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा बरबडा यांच्या वतीने निपून भारत अंतर्गत एफ एल एन पायाभूत साक्षरता अंकज्ञान ओळख हा उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने माता पालक सहविचार सभा घेण्यात आली होती. या वेळी पंचायत समिती चे डी. पि. सुरणे, शाळेचे केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे, सहशिक्षक प्रभाकर शिंदे आणि शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती होती
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना अंकज्ञान ओळख व्हावी तसेच साक्षर होण्यासाठी मदत व्हावी हा उद्देश आहे. दोन वर्ष कोरोना मुळे मुलांची शैक्षणिक घसरण होऊन त्यांना बेसिकली कोणतीही माहिती नसल्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेला पालक माता यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होतीया सर्व पालक मातांना मार्गदर्शन भैराट मॅडम यांनी सखोल असे मार्गदर्शन करून त्यांना प्रत्यक्षिके करून दाखवली आहे.
त्यानंतर या माता गटास भेट व मुलाकडून घरी अभ्यास कसा करून घ्यावा यांचे प्रयोग करून सर्व उपस्थित पालक मातांना प्रत्यक्ष समजावून सांगून मार्गदर्शन करण्यात आले
या डिजिटल युगात मोबाईल चा पूर्णपणे मातांना वापर कशा पद्धतीने करायचा आणि मुलांना हाताळण्यास मदत कशा रीतीने करायच आहे या बद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक माता मधुन वेगवेगळे गट करून त्यांना घरी बोलावून प्रात्यक्षिक करून दाखवायचे आहे आणि योग्य रीतीने माहिती दयायची आहे असे माता पालकांना सांगण्यात आले आहे त्या पद्धतीने माता पालक वर्गातून करून घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0 Comments