विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
नांदेड जिल्ह्यात प्रणिताताई चिखलीकर यांच्या मार्गदर्शना खाली महिला आघाडीचे काम अतिउत्तम चालू असून जनतेच्या अडचणी सोडवण्या साठी प्रणिताताई यांची कल्पकता वाखाणण्याजोगी असल्याचं मत चित्रताई वाघ यांनी नायगाव भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रताई वाघ यांनी देगलूर चा महिला मेळावा आटोपून शुक्रवारी सायंकाळी नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवास स्थानी भेट भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधन्यासाठी भेट दिली
या वेळी नांदेड जि.प.चे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर व सौ.दीपाली ताई होटाळकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी,महानगराध्यक्ष प्रवीण साले जि.प.सदस्य माणिक लोहगावे शितल भालके चित्ररेखा गोरे नांदेड जिल्हाध्यक्ष,वैशाली देशमुख सततारखा पांढरे अपर्णा चितळकर,गँभिरे, आदी उपस्थित होते.
राहुल पा.नकाते,भाऊ पा चव्हाण,सुरेश पाटील कदम शिवाजी पाटील पवार,हरीचंद्र पाटील चव्हाण,गंगाधर पा. कल्याण सय्यद मुल्ला दता पाटील नारे प्रदीप देमेवार शिवराज शिंदे यासह नायगाव शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0 Comments