Header Ads Widget

नांदेड ते बिदर रेल्वे मार्ग कधी चालू होणार जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यानी फुकटचे श्रेय लाटले ? जनतेचा सवाल !!

    
       माधव पवार 
महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या अथवा जिल्हा परिषदेच्या निवडुणका जाहीर झाल्याच्या नंतर राज्यातल्या व जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांना विकासाचे मात्र डोहाळे लागतात परंतु मध्यंतर काळात कोणत्याच राजकीय पुढाऱ्याला कोणताच प्रश्न सुचत नाही गेल्या अनेक वर्षा पासून चर्चेत असलेला विषय गाजत असलेला नांदेड ते बिदर हा रेल्वे मार्ग कधी चालू होणार व या मार्गावरून जनतेच्या सेवेसाठी सदरची रेल्वे गाडी कधी धावणार असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहेनांदेड जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यानी जर प्रयत्न केला तर नांदेड ते बिदर हा मधला मार्ग जनतेच्या सेवेसाठी व सुविधासाठी आणि विकासासाठी हा मार्ग सरळ आणि सोपा असल्यामुळे लवकर चालू झाला तर अनेक वर्षां पासून चर्चेत असलेला विषय मार्गी लागेल तो म्हणजे नांदेड ते बिदर मधला मार्ग रेल्वे गाडी धावली तर जनतेत एक प्रकारचे उत्सव निर्माण होईल आणि विकासाला चालना ही मिळेल असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे 

या जिल्ह्यातील पुढारी फक्त हा विषय निवणूकीच्या तोंडावर आणून जनते समोर ठेवतात असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
या जिल्ह्यातील राजकीय पुढारी नांदेड ते बिदर रेल्वे मार्ग चालू करण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचे अनेक वेळा प्रसार माध्यमातून त्यांचे आश्वासने व बातम्या ऐकवयास मिळाल्या परंतु ह्या रेल्वे मार्गाच्या संदर्भात अद्याप ही कोणती ही काम चालू करण्याची प्रक्रिया चालू झाली नसल्याने सदरची रेल्वे गाडी कधी धावणार व कधी काम चालू होणार जनतेला कधी सेवा मिळणार जनतेचा कधी विकास होणार असे अनेक प्रश्न ग्रामीण भागाच्या जनतेतून चर्चेला जात आहे

राजकीय पुढारी मात्र या मार्गाला आमच्याच प्रयत्नामुळे यश मिळाले असे ह्या जिल्ह्यातील काही पुढार्‍यांचे मत असले तरी हे सदरचे श्रेय फुकट लाटले की काय असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे 



Post a Comment

0 Comments