Header Ads Widget

माजी आमदार पुत्र भावी आमदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण म्हणतात कृष्णुर येथील भारत जोडोची इतिहासातील पहिली विराट सभा -

    
    
     माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार पुत्र भावी आमदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण म्हणतात कृष्णुर येथील भारत जोडोची इतिहासातील पहिली विराट सभा झाली असल्या अभिमान नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी व्यक्त करीत खा. राहुल गांधीच्या भारत जोडो पद यात्रेत सहभागी होऊन गांधीना समर्थन देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे मनपूर्वक धन्यवाद मानले आहे 
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्र राज्यात दाखल झाल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडो पदयात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन समर्थन केले खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रे दरम्यान कॉर्नर बैठका ज्यांना सामान्य माणसाचे प्रश्न समजावून घेत नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात पदार्पण झाली आहे
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खासदार राहुल गांधी यांची कृष्णुर येथील कॉर्नर बैठकीदरम्यान घेण्यात आलेली सभा ही प्रथमच इतिहासातील पहिली विराट सभा असल्याचे ही माजी आमदार पुत्र भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या दरम्यान सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे 

पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह नांदेड जिल्ह्याची पोलीस अधीक्षक कृष्णकुमार  कोकाटे यांनी आपल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  चोक पणे  कर्तव्य बजावण्याचे आदेश दिल्याने यात्रेदरम्यान पोलीस बांधवाचे जाहीर भावी आमदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments