माधव पवार
शेतकऱ्यांच्या शेतातील काल परवा विमा कंपनीच्या माध्यमातून मुसळधार पावसाने पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते ते पंचनामे करण्यात आले आणि बऱ्याच पैकी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नसल्याचे शेतकऱ्यांसह जनतेतून बोलल्या जात असून शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन काढल्याच्या नंतर विमा कंपनीच्या काही प्रतिनिधीनी शेतातील पिकाचे पंचनामे करण्याचा सपाटा उठविला होता
नांदेड जिल्ह्याचे पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट विमा जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे
शेतकऱ्यांच्या काळ्या रानाचे पंचनामे करण्यात आले ते पंचनामे बनवट करण्यात आले असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही अशी भीती निर्माण झाली असल्यामुळे जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड सह जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्ते यांनी संबंधित विभागाचे तहसीलदार यांना निवेदन देऊन कळविण्यात आले होते
विमा कंपनी ही जून जुलै ऑगस्ट माहिन्यात शेतकऱ्यां कडून पीक विमा मोठया प्रमाणात भरून घेत असते परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसाने नुकसान झाल्याच्या नंतर वेळेवर पंचनामे करत नाही आणि शेतकऱ्यांना कमी दर्जेचा विमा मंजूर करून शेतकऱ्यांचे पाण्याने डोळे पुसत असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरसकट विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी गटातून करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्यासाठी एक जबादार जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्यामुळे या पुरोगामी विचाराच्या जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकरी मोठया अपेक्षाने पाहत असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात असून शेतकऱ्यांचे पंचनामे अगोदर करण्यात आले नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे

0 Comments