माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा येथील म्हाळसांकात खंडोबा यात्रा ही नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या नंतर घुंगराळा गावची यात्रा ही दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे काही दिवसात ही सदरची यात्रा येत असल्याने पैलवानासह जनतेला व गावकऱ्याना खंडोबा यात्रेची चाहूल लागली दिसून येत असून यंदा गावकऱ्यांच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार असल्याचे ही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील सदरची यात्रा ही भरगच्च भरण्यासाठी गावातील राजकीय पुढारी व प्रतिष्ठीत मंडळी व नागरिक एकत्र येऊन सदरच्या यात्रेची शोभा दरवर्षी वाढवीत असतात यंदा ही सदरची यात्रा अतिशय तोंडावर आली असल्याने पशु पालकासह व विविध व्यापाऱ्यांना ही या खंडोबा यात्रेची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे आहे
जिल्ह्यातील माळेगाव यात्रेच्या नंतर घुंगराळा येथील खंडोबा यात्रा ही दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे या मोठया प्रमाणात पैलवान बाहेरून येत असतात आणि
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने प्रथम येणाऱ्या पैलवानाला स्वतःचे २१ हाजार रुपयाचे बक्षीस ठेवले जाते व समस्त गावकऱ्याच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने पशुप्रदर्शन भरविल्या जाते
रात्रीच्या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते खंडोबा मंदिराच्या जवळ जागरण गोंधळ अशी विविध कार्यक्रमाचे गावकऱ्यांच्या वतीने आयोजन दरवर्षी करण्यात येते
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे गेल्या दोन वर्षाखाली कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील यात्रेला परवानगी दिली नव्हती परंतु यंदा घुंगराळा येथील खंडोबा यात्रा जोरदार भरणार असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहेसंपूर्ण गावकऱ्यांचे आराध्य दैवत असल्यामुळे अख्ख गाव खंडोबा यात्रेच्या निमित्ताने व बारा महिने भक्तीत तलीन असते सदर खंडोबा रायाची पालखी मौजे कुंटूर येथून वाजत गाजत आणल्या जाते पूर्ण गावाने सदरच्या पालखीच्या मिरवणूकीत सामील होत असते आणि अख्ख गाव भंडरमय दरवर्षी होते आणि या खंडोबाची परंपरा जवळपास ५०० वर्षा पासूनची असल्याची ही काही सुज्ञान नागरिकांनी सांगितले आहे

0 Comments