बरबडा :- किरण हणमंते
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेची सुरवात नांदेड जिल्ह्यातील देलगूर या तालुक्यातील मदनुर नाका येथून होणार असल्याची माहिती नायगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेतृत्व प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांनी दिली.
सध्या देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून सबंध भारतभर सुरू असलेली भारत जोड़ो यात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. यापुढे ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार असून देगलूर तालुक्यातील मदनापुर नाका येथे सदरील यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता देगलूर येथून पदयात्रेस सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकर नगर येथून पदयात्रेस प्रारंभ होणार असुन दुपारी तीन वाजता नायगाव येथील कुसुम लॉन्स या ठिकाणी तर सायंकाळी साडेपाच वाजता कृष्णुर येथे सभा होणार आहे.
त्यानंतर १० तारखेला नवा मोंढा नांदेड येथे सभा होऊन पुढे यात्रा मार्गक्रमण करणार असल्याची माहिती रवींद्र पाटील चव्हाण यांनी आयोजित भारत जोडो यात्रा नियोजन बैठकी दरम्यान प्रत्येक बैठकीत माहिती दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त प्रा. रविंद्र पा. चव्हाण यांनी बरबडा सर्कल मधील विविध गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये मनुर, आंतरगाव, टाकळी, पाटोदा, कहाळा या गावासहित अनेक गावात बैठका घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेस मधील नायगाव चे युवा नेतृत्व रवींद्र पाटील चव्हाण यांच्या समवेत अनेक काँग्रेस पदाधिकारी यांना सोबत घेऊन बैठका घेत आहेत. या बैठका मध्ये माजी सभापती पंचायत समिती नायगाव प्रतिनिधी प्रा. मनोहर पवार, माजी सरपंच बालाजी मदेवाड आदिसह प्रत्येक गावातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आजी व माजी सरपंच आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती मध्ये बैठका पार पडत आहेत.
आंतरगाव मध्ये प्रकाश पाटील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे, चंद्रकांत बळीराम शिंदे, शिवाजी शकुजी शिंदे, रावसाहेब मारुती शिंदे, बाबू बळीराम इबितवार, राजू गायकवाड व अंतर गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
भारत जोडो यात्रेत नायगाव मतदार संघातील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हटले आहे.

0 Comments