बरबडा :- किरण हणमंते
कहाळा येथील हायवे रोडवर जे अतिक्रमण आहे ते काढण्यात यावे अशा सुचना केल्यानंतर लगेच नागरिकांनी असणारे अतिक्रमण काढायला सुरवात केली. यावेळी बांधकाम विभागाच्या वतीने सुचना दिल्याच्या सांगण्यात येत असले तरी नेमक अचानक काढायला सांगितल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. पोलिस स्टेशन च्या नियंत्रणाखाली सर्व अतिक्रमण काढण्यात आली आहे.
अचानक पणे काढण्यात येणारे अतिक्रमण भारत जोडो यात्रेमुळे कि काय? असा प्रश्न समस्त नागरिकांना पडत आहे.
सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त जिल्हाभर बैठका आयोजित केल्या जात आहेत. भारत जोडो यात्रेला नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेची सुरवात जिल्ह्यातील देलगूर येथील मदनुर नाका येथून होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते बैठकाच्या माध्यमातून सांगत आहेत. सदरील यात्रेस नांदेड जिल्ह्यासह इतर मतदार मतदासंघांतील कार्यकर्त्यांनी जास्तीत संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नेते मंडळी करत आहेत.
सध्या देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून सबंध भारतभर सुरू असलेली भारत जोड़ो यात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये असुन यापुढे ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार असून देगलूर तालुक्यातील मदनापुर नाका येथे सदरील यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता देगलूर येथून पदयात्रेस सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकर नगर येथून पदयात्रेस प्रारंभ होणार असुन दुपारी तीन वाजता नायगाव येथील कुसुम लॉन्स येथे व सायंकाळी साडेपाच वाजता कृष्णुर येथे सभा होणार आहे. त्यानंतर १० तारखेला नवा मोंढा नांदेड येथे सभा होऊन पुढे यात्रा मार्गक्रमण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या यात्रेच्या निमित्ताने सर्व प्रशासन कामाला लागले असुन जे रोड वर असणारे अतिक्रमण हटविल्या जात आहे. पोलिस कर्मचारी, सी आर पि एफ च्या तुकडया बोलावून घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या यात्रानिमित्त च हे सर्व अतिक्रमण काढत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. या अतिक्रमणाला प्रशासन जोरदार तयारी करूनच कामाला लागले आहे जर कोणी नाही काढले तर सरळ जेसीपी च्या माध्यमातून काढू असा सक्त इशारा कर्मचारी देत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

0 Comments