Header Ads Widget

नांदेड जिल्हयात ‘रस्ता सुरक्षा अभियानास' उत्तम प्रतिसाद.

       माधव पवार 
जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड आणि फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बळीरामपूर ता.जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ३३ व्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत शाहीर अण्णाभाऊ साठे विध्यालय,व जनता कनिष्ठ विद्यालय नायगाव, येथे महाविद्यालयीन युवक , प्राध्यापक ,व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा नियमावली बाबत मार्गदर्शन शिबीर व पथनाट्य सादरीकरण करण्यात आले आहे

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्या संदर्भात कलापथकांनी पथनाट्य सादरणी करणातून रस्ता सुरक्षिततेची जनजागृती करण्यात आली आहे 
संपूर्ण नांदेड जिल्हामध्ये  ३३ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील सोळा तालुक्यात भ्रमंती करीत उपरोक्त कलापथकातील कलाकारांच्या व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या साहाय्याने  विविध महाविद्यालयात, शहरातील मुख्य चौकात , पथनाट्य सादर करण्यात आले आहे
दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर, चारचाकीत बसलेले असतांना सीट बेल्टचे महत्व, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळणे, शालेय बसमधून प्रवास करतांना मुलांनी घ्यावयाची काळजी  अशा अनेक बाबींवर उचित नाट्यमय प्रसंग उभे करून लोकप्रबोधन करण्यात येत आहे
वाहतूक नियमांचे पालन केल्याने आपण अपघात टाळू शकतो हे पटवून देण्यात येत आहे. सर्व वाहन धारकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे सूत्र समजावतांना  आणि वाहतुकीच्या नियमांचे संदेश देतांना प्रत्येक शहरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे फकीरा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष तेलंग व मानद सचिव तथा मार्गदर्शक साईप्रसाद जळपतराव यांनी सांगितले.जिल्हाभर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रभावी जनजागृतीसाठी उपरोल्लेखित कलामंचाचे मुख्य गायक माधव वाघमारे, प्रसिद्ध गायिका सविता गोदाम, तबलावादक रामगोपाल वाघमारे, हार्मोनियम वादक सुरज गायकवाड,सहकलाकार दत्ता पोटलेवाड,प्रविण मल्लेवारआदी कलावंत परिश्रम घेत आहेत.

या अभिनव उपक्रमाची नागरिकही ठिकठिकाणी प्रशंसा करीत आहेत.तर रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाभर यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संस्थेचे सचिव साईप्रसाद जळपतराव, बाळासाहेब टिकेकर,सचिन वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments