Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर पुणे येथील भव्य अधिवेशनात एस एम देशमुख यांच्या कडून संघाचे कौतुक !!


     

    
       माधव पवार
पुणे येथे होत असलेल्या भव्य अधिवेशनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांच्यासह तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार आणि दिलीप वाघमारे,
प्रकाश भाऊ हनमंते  ज्येष्ठ पत्रकार मनोहर तेलंग सय्यद जाफर,प्रकाश महिपाळे पंडित वाघमारे लक्ष्मणराव बर्गे आदी पत्रकारांची टीम सूर्यकांत सोनखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे गेली आहे
पुणे येथे होत असलेल्या भव्य अधिवेशनात दाखल झाले यावेळी  मराठी पत्रकार संघाचे भव्य अधिवेशनात हा संघ अग्रेसर असल्याचे एस एम देशमुख यांनी सांगून संघाचे कौतुक केले असून नायगाव मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वन्ने यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबातील सुखा दुखात सहभागी होण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला पिको मशीन व आर्थिक मदत केल्यामुळे नायगाव मराठी पत्रकार संघाचे यावेळी विशेष मान्यवरा कडून अभिनंदन ही करण्यात आले आहे 
पुणे येथे होत असलेल्या अधिवेशनात सहभाग घेऊन नांदेड जिल्ह्याचे नावलौकिक करण्यासाठी विजय जोशी यांच्या विचाराची नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी ही अतिशय सक्षम व अग्रेसर असल्यामुळे याच अधिवेशनात एस एम देशमुख यांच्यासह विजय जोशी यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने व चांगल्या विचार धारेतून नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कौतुक केले आहेसदरच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी नायगाव तालुक्यातील मांजरम कुंटूर नरसी बरबडा या चार सर्कल मधून पत्रकारांची सक्षम टीम ही पुणे येथे होत असलेल्या अधिवेशनास सहभागी झाले आहेत

नायगाव तालुका मराठी पत्रकार संघातील जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लखपत्रेवार मनोहर तेलंग सय्यद जाफर विद्यमान नायगाव तालुका अध्यक्ष गजानन चौधरी तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे सचिव दिलीप वाघमारे प्रकाश भाऊ हनमंते शेषराव खंदारे गोविंद टोकलवाड पंडित वाघमारे सुभाष पेरकेवार मनोहर मोरे रामप्रसाद  चन्नावार आदी पत्रकार मंडळी अधिवेशनास गेले असून यावेळी नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर असल्यामुळे पुणे येथील भव्य अधिवेशनात एस एम देशमुख यांच्या कडून संघाचे कौतुक करण्यात आले आहे 



Post a Comment

0 Comments