Header Ads Widget

इकळीमाळ येथे गावगाड्याच्या राजकारणात नागरिक हैराण सरपंच व उपसरपंच सक्षम नसल्यामुळे महिला ग्रामसेवकाना करावा लागतो अडचणीचा सामना !!



      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे एकळीमाळ येथे गावगाड्याच्या राजाकरणात गावातील नागरिक वेगवेगळ्या कारणाहुन व समस्यातुन हैराण असल्यामुळे व सरपंच व उपसरपंच सक्षम नसल्यामुळे या गावच्या महिला ग्रामसेवक सौ विद्याताई मोरे यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालया समोर येथील नागरिकाच उपोषण चालू होते ते उपोषण नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आश्वासना नंतर मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे 
तालुक्यातील या माळइकळीच्या कर्तव्यदक्ष ग्रामसेविका सौ विद्याताई मोरे यांना बराच काही त्रास जाणवत असल्याचे काही सुज्ञान नागरिकांतुन बोलल्या जात असून सदरच्या महिला सरपंच व महिला उपसरपंच यांच्या असक्षम कार्यप्रणालीमुळे बऱ्याच नागरिकाचा त्यांच्या कार्यपद्धतीवर एका बाजूने संताप व्यक्त केल्या जात आहेइकळीमाळ येथील महिला उपसरपंच प्रतिनिधीचा या गावात कारभार असल्यामुळे सरपंच महिला मात्र नामधारी नावाचं असल्याचे सांगण्यात येत असले गावाचा विकास ग्रामसेवकामुळे होतोय मात्र गावकरी सहकार्य करत नसल्यामुळे गावचा विकास विस्कळीत होण्याचे संकेत मिळत आहे महिला ग्रामसेवक सौ विद्या मोरे मात्र नकोत्या अडचणीला सामोरे जावे लागत असून सदरच्या गावातील राजकारणामुळे ग्रामसेवक ही त्रस्त झाल्याचे सांगण्यात येत असले तरी महिला ग्रामसेवक ह्या विकास करण्याच्या संदर्भात सक्षम असल्यामुळे सदरच्या अडचणीचा सामना करीत गाव सांभाळत असल्याचे सांगण्यात येत आहे

ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीचे राजकारण मात्र कारणी भूत ठरत असल्यामुळे गायरान जमिनी वरील अतिक्रमण हटवित येत असल्यामुळे खरे या गावच्या महिला सरपंच व उपसरपंच या दोन्ही महिला सक्षम नसल्यामुळे उपसरपंच प्रतिनिधी यांनी गावचा कारभार पाहत आहे

Post a Comment

0 Comments