माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता हा बेवारस असल्यामुळे या रस्त्यावरून रात्रंदिवस वाहनाची मोठी वर्दळ असताना सुद्धा ह्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे बेहाल झाले याच रस्त्यावर कुंटूरकर शुगर कारखाना या रस्त्यावरून सदरच्या साखर कारखान्याला रात्रंदिवस ऊस वाहतूक करण्यात येते कारखाना प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या रस्त्यावर पाणी न टाकताच वाहतूक चालू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? आले आहे तालुक्यातील बळेगाव ते रुई बु घुंगराळा या रस्त्यावर कुंटूरकर शुगर कारखान्याला जाण्यासाठी ट्रकच्या सह्याने ट्रॅक्टरच्या साह्याने ऊसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत असल्यामुळे या रस्त्या वरील धुरळा तुफानी स्वरूपात उडत असल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मोटर सायकल वाहन धारकासह नागरिकांला रस्त्या वरून मजबुरीने जावे लागत आहे सदरच्या वाहनाच्या धुरळ्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कारखाना प्रशासनानी तात्काळ रस्त्यावर पाणी टाकून ऊस वाहतूक सुरळीत ठेवावी अशी मागणी होत आहे
कुंटूरकर शुगर कारखाना हा माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचा असल्यामुळे या कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक केली जाते
परंतु रस्त्यावर पाणी टाकले नसल्यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत सदरच्या पाणी टाकावे असे या विभागातील तमाम जनतेतून मागणी करण्यात येत आहे अधून मधून या कारखाना प्रशासनाने रस्त्यावर पाणी टाकले तर ऊस वाहतुकीचा धुरळा उडणार नाही आणि जन सामान्य माणसाचे आरोग्य ही धोक्यात येणार नाही यांची दक्षता कारखाना प्रशासनानी लक्ष देऊन पाणी टाकावे अशी मागणी सदरील जनतेतून करण्यात येत आहे

0 Comments