मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव येथील विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या व लाईटचे किडे आढळून आल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (ता.२२) रोजी दुपारच्या जेवणात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेवण करित असताना अचानक विद्यार्थ्यांच्या ताटात अळ्या दिसून आल्याने विद्यार्थ्यांनी तेच ताट घेऊन ग्रंथपालाच्या केबीनमध्ये शिरून सदरील गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्या चा प्रकार घडला आहे
वसतिगृहात जेवण चविष्ट मिळत नाही. जेवण बनविण्यासाठी दुषित पाण्याचा वापर केला जातो. रोजच्या आहारामध्ये बदल करित नाहीत. तांदुळ योग्य वापरले जात नाही. सदरील गंभीर प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार केली असता.पंरतु दखल घेतली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या गंभीर बाबींकडे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करतो. येथे मात्र काही वेळा विद्यार्थ्यांना उपाशी पोटी राहावे लागत आहे
निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन मागासवर्गीय मुलांची हाल थांबवून संबंधितांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून केली जाते
-------------------------------------------------------------------
वसतिगृहातील दुपारच्या जेवणात अळ्या व लाईटचे किडे निघाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.मी स्वता तातडीने चौकशी केली आहे. सदरील बाब वरिष्ठांना सांगितले आहे.आचारी महिलेची चुक झाली आहे. विद्यार्थ्यांना दुसरे जेवण बनवून दिल आहे.असे
ग्रंथपाल अधिकारी गणेश भायगावकरशासकीय वसतिगृह नायगाव यांनी सांगितले
-------------------------------------------------------------------
दुपारचे जेवण करित असताना गोबीच्या भाजी आळ्या दिसून आल्या आहेत.गव्हाचे पिट,तांदुळ निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहेत.वसतिगृहात सोई सुविधा उपलब्ध नाहीत.दुषित पाण्याचा वापर केला जातो. [ अरुण झुंजारे विद्यार्थी ]
भोजनालयाच्या मनमानी कारभाराची आयुक्तांकडे तक्रार केली.मात्र दखल घेतली नाही.नेहमी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला आहे. कंत्राटदारांची मनमानी प्रकार चालू असून.सदरील प्रकरणी चौकशी झाली पाहिजे.
[ राजरत्न हांनवटे विद्यार्थी ]


0 Comments