परमात्मा हा जीवनाचा सार असून शेषाचा आवतार हा जीवन मुल्याचे गोकुळ सरूप वारूळातुन प्रगट झालेले जगदउधाराचे कल्याणकारी भगवंत परमात्मा आहेत असे प्रतिपादन ह.भ.प.सद्गुरू गाथा मूर्ती चंद्रशेखर महाराज यांनी उपस्थित जनसमुदयाला भगवान बालाजी कथेच्या समारोप प्रसंगी मंगळवारी सायंकाळी भगवान बालाजी मंदिर नरसी या ठिकाणी प्रबोधित करताना व्यक्त केले
सद्गुरू गुंडा महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी सोहळ्यात गेल्या चार दिवसा पासून चालू असलेल्या भगवान बालाजी यांच्या कथेचा समारोप मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पार पडला आहे
यावेळी नरसी परिसरातून हजारो भक्तांनी या सोहळ्याचा आनंद लुटला असून दररोज रात्री ह.भ.प.योगीराज महाराज गीसावी पैठण,उल्हास महाराज सूर्यवंशी, जयंत महाराज बोधले,या सह महाराष्ट्रातील नांमवन्त कीर्तनकाराची कीर्तने व नांमवन्त कलावन्त पंडित धनंजय जोशी यांचे गायन तालमनी प्रशांत गाजरे यांचे तबला वादन व त्यांच्या शिष्यानी सादर केलेले ताल संकीर्तनपार पडले.या सर्व कार्यक्रमाचे संचलन लक्ष्मण महाराज रामदासी यांनी केले
या कार्यक्रमात खा.प्रताप पाटील चिखलीकर,माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर,आ.राम पाटील रातोळीकर,माजी आ.वसंत चव्हाण,आ.राजेश पवार माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर श्रावण
पाटील भिलवंडे बालाजी बचेवार,संजय आपा बेळगे,या सह अनेक मान्यवर यांनी हजेरी लावून आशीर्वाद घेतले.
गेल्या पाच दिवसापासून चालु असलेल्या भक्तीज्ञान सोहळ्यात भक्ती चा रस नरसी येथे ओथबुन वाहत असून आज दि.१६नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे तरी नरसी परिसरातील भक्त गणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू गुंडा महाराज पुण्यसमरण सोहळा समिती नरसी च्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments