Header Ads Widget

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल खैरगाव येथे पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती ( बालक दिन उत्साहात साजरी

नायगाव : मधुकर जवळे :- 

नायगांव तालुक्यातील खैरगाव येथिल ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ( बालक दिन उत्साहात साजरी करण्यात आली. या बालक दिना निमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
प्रामुख्याची बाब म्हणजे शाळेतील सर्व शिक्षक  शिक्षिकांनी मुलांसाठी, मुलांसमवेत या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला आणि हा दिवस मुलांसाठी स्पेशल आणि अविस्मरणीय बनवला  विविध ग्रुप मार्फत शिक्षकांनी आपली कला सादर करून  मुलांचे मनोरंजन केले.या  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कुमुदकांत पटेल (संस्थापक सचिव) हे होते
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. सरोज धरणे मॅडम व स्कुल टीचर्स व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. कुमुदकांत पटेल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व बालक दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेचे सांस्कृतिक प्रमुख श्री. अर्जुन बैस सर व त्यांच्या टीम ने केले या प्रसंगी सर्व शिक्षक - शिक्षिकांच्या सादर केलेल्या कला गुणांचे मा. कुमुदकांत पटेल सर यांनी भरभरून कौतुक केले.आणि  अत्यंत उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments