माधव पवार
नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या अपंग निराधार व्यक्तीना प्रशासनाच्या दरबारात न्याय मिळेल की नाही असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असला तरी सदरची अपंग व्यक्तीचे नांव इस्माईल हुसेनसाब कासार हा लाभार्थी अनेक महिन्या पासून प्रशासनाने न्याय मिळावा प्रयत्न करीत असून या कडे कोणत्याही अधिकाऱ्यानी व कर्मचाऱ्यांनी दाद मिळत नसल्यामुळे लाभार्थीतुन सांगण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे लक्ष द्यावे अशी मागणी पत्रकार तथा शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बालाजी माली पाटील मांजरमकर यांनी केली आहे
तालुक्यातील मांजरम येथील रहिवासी असलेला हा अपंग ग्रस्त गेल्या वर्षा पासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून नायगावच्या तहसील कार्यालयात अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येते सदरची फाईल सुद्धा सेतू केंद्राच्या मार्फत ऑनलाईन केली असताना सुद्धा या अपंग व्यक्तीना सदरच्या योजनेचा लाभ का ? मिळत नसावा असा प्रश्न पडला आहे
सदरील हा व्यक्ती एका उजव्या पायाने अपंग असून अशा अपंग निराधार लाभार्थीची फाईल जिल्हाधिकाऱ्यासह नायगावच्या तहसीलदारानी मंजूर करून दयावेत त्याना संजय गांधी योजनेचा परिपूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रयत्न करतील अशी अपेक्षा पत्रकार बालाजी माली पाटील मांजरमकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे


0 Comments