नायगाव प्रतिनिधी :- मधुकर जवळे :-
कार्तिकी एकादशी निमित्ताने जागर हरिनाम याचा या कार्यक्रमा अंतर्गत नायगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर जुनेगाव येथे सुप्रसिद्ध किर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी प्रमाणे नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने आयोजित जागर हरीनाम याचा या कीर्तन सेवेचे आयोजन नायगाव मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष प्रसिद्धी सेवा सहकार्याने करण्यात येते.
पारंपरिक या किर्तन सेवेसाठी यंदा परिसरातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य किर्तनकार ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या कीर्तनाचे आयोजन दि ०४ नोव्हेंबर रोज शुक्रवारी रात्री ठीक ०८:३० वाजता शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर नायगाव येथे करण्यात आले आहे
या कीर्तन सोहळ्यात परिसरातील नामवंत व सर्वगुण संपन्न कलाकारांची साथ असणार असून यात स्वरसंगम मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, बाळासाहेब पांडे, बाबुरावजी लंगडापुरे, गायनाचार्य प्रा. बिरादार सर, प्रा. माधव किनाळकर,गणेश हाके, माधव अप्पा नंदगावकर, नामदेवजी भाविकभक्तांनी पांचाळ, स्वरगंगा संगीत संचाचे गणेशजी हाके, मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, बालाजी चौधरी, हभप त्र्यंबक स्वामी नंदगावकर, शिभप बालाजी
भोस्कर, विकासजी भूरे, चंद्रकांत आमलापूरे, गायनाचार्य रमेश पाटील जाधव, सुभाष पाटील शिंपाळे, साईनाथ पाटील शिंपाळे, मृदंगाचार्य रोती नकाते, बासरीवादक विजय द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर बैस, तबलावादक हरीप्रसाद पांडे, प्रा. वसंत माने सर, दिलीप पाटील चव्हाण, अशोक चव्हाण, शंकर अप्पा बेळगे, होळकर , मामा, सदाशिव मदेवाड, शिव महाराज, लक्ष्मण पाटील कल्याण आदींसह परिसरातील गुणी कलावंत यांची साथ संगत लाभणार असून या किर्तन सेवेचा परिसरातील लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवार नायगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

0 Comments