Header Ads Widget

बळेगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक जागेत जनावरे बांधण्यासव व बाहेर शौचालयास जाण्यास सरपंच उपसरपंच यांची मनाई शौचालय बांधण्याचे आवाहन

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत की तालुक्यात स्वच्छ गाव सुंदर गाव बनविण्यासाठी पॅनल प्रमुख तथा गावचे उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांच्यासह सरपंच सौ वर्षा मिलिंद गायकवाड, ग्रामसेवक आर एन मदेवाड यांनी मोठा पुढाकार घेतला असल्यामुळे गावातील नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावर आपले घरगुती जनावरे रस्त्यावर बांधण्यात येऊ नये आणि शासनाच्या ध्येय धोरणा नुसार स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत गाव स्वच्छ करण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे 
तालुक्यातील मौजे बळेगाव ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या दिशेने जात असल्यामुळे गावातील नागरिकानी जास्तीत जास्त स्वच्छालय बांधून घ्यावेत असे उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर यांनी आवाहन केले असून गावातील प्रिय बांधवानी व नागरिकानी घरी स्वच्छाय बांधून घ्यावेत गावात स्वच्छता  ठेवण्यासाठी स्वच्छालयाचा परिपूर्ण वापर करावेत बाहेर संडाससाठी कोणी जाऊ नयेत जर कोणी स्वच्छलय न बांधता बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा संकल्प ग्रामपंचायत कार्यालय मौजे बळेगाव यांनी केला आहे 
मौजे बळेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावात विविध विकास कामे करण्यात आले असून इतर उर्वरित कामे करण्यासाठी सरपंच व उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावच्या विकासाला गती दिली असल्यामुळे गावात पाण्याचा प्रश्न लाईट व्यवस्था रस्ते सुटसुटीत करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर यांनी चांगलाच पुढाकार घेत जिल्ह्यासह तालुक्यात एक वेगळ्या पद्धतीची बळेगाव नगरी दिसली पाहिजे हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून विकास कामाला प्राधान्य दिले असल्याचे उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर यांनी सांगितले आहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील सांडपाणी आणि घाण पाणी रस्त्याने जाऊन घाण गावात पसरू नये म्हणून काही ठिकाणी घाण पाणी मुरण्यासाठी चंबर ही बांधण्यात आले  काही दिवसात सदरचे पाणी चंबर मध्ये सोडून घाहाण मुक्त गाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पॅनल प्रमुख तथा व गावचे उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर यांनी सांगितले असून गावातील नागरिकांनी स्वच्छ गाव करण्यासाठी व जिल्ह्यात व तालुक्यात प्रथम येण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय बळेगाव यांना सहकार्य करण्याचे ही उपसरपंचानी आवाहन केले सदरची ग्रामपंचायतला दिशा देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments