Header Ads Widget

कुंचेली येथे गॅसच्या स्फोटात संसार उपयोगी सामान तर तीस हजार रोख रक्कमेसह सव्वा लाखाचे नुकसान गरीब कुटूंबाचा संसार उध्वस्त !!


      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे कुंचोली येथे अचानक घरगुती गॅसचा स्फोट झाल्यामुळे सदरच्या लागलेल्या बर्निंग मध्ये घरातील संसार उपयोगी सामान जळून गेल्यामुळे घर मालकाचे रोख रक्कम पंचवीस ते तीस हाजार रुपये खाक झाले तर अंदाजे सव्वा लाख रूपायाच्या वर आर्थिक नुकसान झाल्याची भयानक घटना दिनांक ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ठीक साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
तालुक्यातील सदरच्या घटनेत कोणाला ही काही झाले नसल्याचे सांगण्यात येत असून गॅसमुळे लागलेली आग विजविण्यासाठी गावकऱ्यानी शर्थीचे प्रयत्न केल्याचे अनेकांनी सांगितले असून या प्रकरणात म्हणजे या घटनेत गावचे सरपंच गोविंद पाटील डाकोरे यांनी सहभाग घेऊन सदरची आग गावकऱ्याच्या मदतीने आटोक्यात आणल्याचे सांगण्यात येत असले तरी तात्काळ शासनाने या कुटूंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरीत आहे 
मौजे  कुंचेली गावचे सरपंच विद्यमान गोविंद पाटील डाकोरे यांनी घरगुती गॅसचा स्फोट झालेल्या घटनेची सविस्तर माहिती तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्याना दिल्यामुळे तहसीलदाराच्या आदेशानुसार तलाठी ए एम मोखेडे यांनी सदरील घटनेची पाहणी करून पंचनामा केला सदर लागलेल्या आगीत कसल्याची जीवित हानी झाली नसली तरी सदरच्या चव्हाण परिवारातील आग विजविताना जाळाची आच लागल्यामुळे सदरच्या व्यक्तीना नायगावच्या रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येते आहे 

Post a Comment

0 Comments