Header Ads Widget

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडोच्या यात्रेचे आगमन काही दिवसात होत असल्याने विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची झोप उडाली राज्य महामार्ग झाला टकाटक -

      माधव पवार
काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी यांचे सुपुत्र काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे काही दिवसात नांदेड जिल्ह्यात आगमन होत असल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली असल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे स्वच्छता राबविली जात आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्षाचे बारा महिने रस्त्यावर दिसत नाहीत परंतु खासदार राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गा वरील रस्त्याच्या बाजूने वाढलेले गवत व तरोटा जेसीबीच्या साह्याने काढून टाकत असल्याने राज्य महामार्ग अगदी टकाटक दिसत आहे
काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गा वरून येत असल्यामुळे के टी कंट्रक्शन वाल्याने सुद्धा राज्य महामार्गावर डांबर टाकून रस्ता टकाटक करीत असल्याचे दिसून येत असले तरी या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली असल्याचे ही दिसून येत असून या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत
ते खडे भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह के.टी कंट्रक्शन यांनी सरळ सरळ डांबरी करण करत असल्याचे ही वास्तव चित्र दिसून येत असले तरी असेच रस्ते अगोदर पासूनच साफ केले असते तर रस्त्याची बिकट अवस्था झाली नसती असे ही जनतेतून बोलल्या जात आहे
नरसी पासून ते नायगाव पर्यंत व नांदेड पर्यंत रस्त्याच्या बाजूने वाढलेले गवत आणि तरोटा झुडपे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने काढून घेत आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या यात्रेच्या दरम्यान रस्त्यावर कसल्याच प्रकारचे घाण व अतिक्रमण दिसू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्ग एकदम साफ सफाई करण्याच्या कामाला गती दिली आहे

वर्ष भरात कधीच न दिसणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी राज्य महामार्गावर साफ सफाई करण्याचे काम चालू केले असल्याचे दिसून येत असून सदरच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली असल्याचे ही जनतेतून बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments