नायगाव तालुक्यातील कुंटूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सात कोटी ८२ लाख ९४ हजार रुपयाचे शासकीय अनुदान वाटप करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे शाखा अधिकारी वानोळे यांनी माहिती दिसून या बँकेच्या खातेदारांनी व शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाची रक्कम बँकेच्या देण्यात आलेल्या एटीएमच्या बऱ्याच पैकी शेतकऱ्यांनी रक्कम उचलली असून ज्या शेतकऱ्यांनी एटीएम घेतले नाहीत त्या शेतकऱ्यांना बँकेतून अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येत असल्याचे ही बँकेचे शाखा अधिकारी वानोळे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या काही तालुक्यांपैकी शाखा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज वाटप असो की शासकीय अनुदान असो अथवा पीक विमा असो या बँकेच्या यंत्रणेने शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन सुट्टीचा वार असो असो की बँका चालू असो सदरच्या शेतकऱ्याला तात्काळ रक्कम बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह अंतर्गत काम करणारे बँकेचे कर्मचारी व्यवस्थितपणे सदर बँकेचा कारभार बँकेची आर्थिक व्यवस्था व ठेवीदार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचेही नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सांगितलेहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी व विकासासाठी असल्यामुळे बँकेच्या अंतर्गत मधील शेतकरी या बँकेवर मोठा विश्वास संपादन केल्यामुळे मुसळधार पावासाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे प्रशासनाने शासकीय अनुदान या बँकेत शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी एकूण ७ कोठी ८२ लाख ९४ हाजार ८७२ रुपये मेळगाव परडवाडी रुई बुजरूक रुई खुर्द राजगडनगर सादकपूर सातेगाव सांगवी सालेगाव या गावांना शासकीय अनुदान वाटप करण्यात
आले आहे
कुंटूर बँकेच्या अंतर्गत असलेल्या गावा पैकी कोकलेगाव, कुंटूर, इज्जतगाव, इकळीमाळ, हुस्सा, डोंगरगाव, धनंज, चारवाडी, बळेगाव हे वाटप करण्यासाठी बँक सज्ज असल्याचे शाखाधिकारी वानोळे यांनी सांगितले आहे

0 Comments