विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
परमात्मा प्राप्ती साठी संत चरित्र व संत सेवा महत्वाची असून संतजीवन म्हणजे मानवी जीवनाच्या उदधाराचे साधन होय,संतांच्या भेटीतून परमात्मा भेटतो असे मत एकनाथ महाराज पैठण यांचे वंशज ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी यांनी केले
नरसी ता नायगाव येथे गुंडा महाराज देगलूरकर यांचा ५८ वा पुण्यसमरण सोहळा दि.१२ ते १६ नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफताना अभंगावर विवेचन करताना योगीराज महाराज यांनी संत वचन किती महत्वाचे याचे स्पष्टीकरण करून सांगितले.नाथ महाराजांनी उपदेशपर अभंगातून समाजाला प्रबोधन केले आहे.
बुद्धा चे मूळ तत्वज्ञान हे प्रगल्भ विचाराचे होते.तसे आत्मसात करणे महत्वाची गरज आहे. असे विचार त्यांनी कीर्तनातून अभिव्यक्त करताना सांगितले.त्यांनी अनेक उदाहरण देऊन भक्ती व वैराग्य किती महत्वाचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांनी सांगितले
मानवी जीवनात मनुष्य धडपड करतो पण जास्त धावाधाव करून ही जीवनात काही गोष्टींची प्राप्ती होत नाही. त्यामुळे प्रारब्धात आहे ते मिळते यासाठी मनुष्य जीवनात संत चरणी विश्वास ठेवून जीवन जगावे म्हणजे आपल्या जीवनाचे फलित होते असा प्रगल्भ विचार योगीराज महाराज यांनी मांडला.
या सोहळ्यात गाथा मूर्ती ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कीर्तन सोहळ्यास उपस्थिती होती.दि.११ रोजी देगलूरकर महाराज यांच्या आगमना प्रित्यर्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली.बालाजी मंदिर येथे संत पूजन करण्यात आले व स्वागत सोहळा घेण्यात आला. दररोज दुपारी चार ते सहा भगवान बालाजी यांच्या चरित्राची देगलूरकर महाराज यांच्या अमृत वाणीतून कथा श्रवणाचा लाभ नरसी पंचक्रोशीतल भाविक घेत आहेत
दुसऱ्या दिवशी ह.भ.प.सूर्यवंशी महाराज यांची कीर्तन सेवा झाली.आज दि.१४ नोव्हेंबर रोजी जयंत महाराज बोधले यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे.

0 Comments