Header Ads Widget

नांदेडच्या तारासिंग मार्केट परिसरात लागलेल्या भीषण अग्नी तांडवात लाखोचे नुकसान - आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह वजीराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले

     माधव पवार
नांदेडच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तारासिंग मार्केट परिसरात एका चार चाकी वाहनासह तीन दुकानाला  अचानक आग लागली असल्यामुळे सदरच्या अग्नी तांडवात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत असून सदरची घटना ही दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी घडली या आगीची घटना कळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी लागलेल्या आगीवर सहज यश मिळविले आहे असल्याचे ही सदरच्या जमावातून बोलल्या जात होते
शहरातील तारासिंग मार्केट परिसरात लागलेल्या अग्नी तांडवात जोगिंदर सिंग रामगडिया बक्षीसिंग जहागीरदार यांच्या घराखाली असलेल्या एका चार चाकी वाहनासह मोटर सायकलला दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास सदरची आग लागली होती या अग्नी तांडवात नांदेड शहरातील व परिसरात रुद्ररूप धारण केले होते इलेक्ट्रॉनिक दुकानासह अन्य दोन दुकानाला सदरच्या अग्नीने पेट घेतली होती सदरची आग ही काही मिनिटातच दूर पोहोचली असल्याचे ही व्रत ऑनलाईन प्रकाशित करण्यात येत आहे
तारासिंग परिसरात या अग्नीतांडवाची घटना कळतात येथील रहिवासी असलेले काँग्रेस पक्षाचे अशोक सिंग हजारी याने तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले असता अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी येऊन सदरची आग आटोक्यात आणली असल्याची ही वास्तव चित्र पाहावयास मिळाले आहे
सदरील आगीची काही सुज्ञान नागरिकांनी वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना सदरची माहिती कळविण्यात आली होती सदरचे पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले त्याच बरोबर अग्निशमन दलाचे युद्ध पातळीवर काम करणारे जवान सुद्धा आपल्या वाहनाच्या साह्याने तारासिंग मार्केटच्या दिशेने निघाले सदरची आग तात्काळ आटोक्यात आणली असल्याने पुढील अनार्थ टळला असल्याची ही चर्चा चालू होती 

नांदेडच्या तारासिंग मार्केट परिसरात लागलेल्या भीषण अग्नी तांडवात लाखोचे नुकसान सदरच्या अग्नितांडवात झाले असल्याची माहिती मिळते आहे



Post a Comment

0 Comments