Header Ads Widget

नायगावच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यानी उन्हाळ्या पूर्वी अर्धवट विहिरीसह टॉकी काम पूर्ण करावे - अन्यथा -- घागर मोर्चा ? --


नायगाव :- मधुकर जवळे :- 

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात सन २०१३ साला पासून आज पर्यंत करण्यात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा नायगावच्या अंतर्गत अधिकाऱ्यांनी खेड्या पाड्यातील पाणी पुरवठ्याचे कामे अद्याप पूर्ण केले नसल्याने ते तात्काळ पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी जनसामान्य माणसातून होत आहे
--------------------------------------------------------------------
!! """ नागरिकांचा कार्यालयावर घागर मोर्चा ? """!!

ग्रामीण भागातील सदरचे काम हे उन्हाळ्या पूर्वी पूर्ण करण्यात यावेत अन्यथा खेड्यापाड्यातील नागरिक पाणी पुरवठा विभाग नायगावच्या कार्यालयावरच घागर मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील अनेक गावात पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे शासनाने पाणी पुरवठ्यासाठी लाखो रुपयांची निधी येऊन सुद्धा सदरच्या अधिकाऱ्यांनी अद्याप काम पूर्ण केले नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात असून सदरच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट विहिरीचे व टाकीचे काम पूर्ण करीत नाहीत असा ही प्रश्न चर्चेला जात असून सदरचे अधिकारी पगारा पुरतेच की काय ? असा प्रश्न जनसामान्य माणसातून उपस्थित केला जात आहेनायगावच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत  अनेक गावात विहिरीचे टाकीचे कामे करण्यात आलेले कामे कोणत्याच गावात पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा  उन्हाळ्यात सामना करावा लागत आहे

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत असलेल्या खेड्यापाड्यात सदरच्या योजनेचा चांगलाच बट्ट्याबोळ अधिकाऱ्यांमुळे झाला असल्याने कोणताच अधिकारी व कर्मचारी पाणी पुरवठ्याच्या टाकी कडे व विहिरीकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून सदरचे पाणीपुरवठा अधिकारी नावालाच असल्याचे ग्रामीण भागातील जनतेतून बोलल्या जात आहे 


Post a Comment

0 Comments