Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील पिंपळगाव येथील साप्ताहिक महिमा खादीच्या संपादक गजानन बिडकर तेलंगणा हैद्राबाद येथे भव्य गौरव !!

  
        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक साप्ताहिक महिमा खादीचा गजानन गंगाधरराव बिडकर यांच्या कार्याची गौरव आता महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राज्यात सुद्धा होताना दिसून येत असून आंध्रप्रदेशातील तेलंगणा येथील हैद्राबाद शहरात विशेष मान्यवरांच्या उपस्थित भव्य गौरव करण्यात येत आहे
गेल्या अनेक वर्षा पासून कार्यरत असलेली संस्था तेलंगणा मराठा मंडळ श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज मराठा सांस्कृतिक ट्रस्ट आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज मराठा युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी दसरा दिवाळी संमेलन आयोजित करण्यात येते आहेया दसरा दिवाळी दरम्यान स्नेह संमेलनात मराठा व मराठी समाजातील विविध क्षेत्रातील कलावंत विशेष मान्यवर व क्रीडा शिक्षा व व्यावसायिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही आयोजित करण्यात येते

पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर म्हणून गजानन बिडकर यांची निवड करण्यात आली होती दिनांक २०नोव्हेंबर २०२२ रोजी त्यात त्यांना हैदराबाद येथे बोलावून त्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन विद्यमान साप्तहिक महिमा खादीचा संपादक गजानन बिडकर यांचा गौरवण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments