विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
नायगाव तालुक्यात वीस हजार लोकांचे जेवणाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करून त्यांच्या भोजना साठी दिवसभर नायगावच्या चव्हाण परिवाराने केलेल्या नियोजनाचे महराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या सह भारत जोडो यात्रेतील सहभागीतांनी माजी आ.वसंत चव्हाण व त्यांचे सुपुत्र प्रा रवींद्र चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक करून चव्हाण परिवाराच्या कार्याची प्रशं सा शशाबासकी दिली.
नायगाव येथील दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी खा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा नायगाव तालुक्यात भल्या सकाळी आली.नरसी येथे स्वागत झाल्या नतर ही यात्रा नायगाव शहरात सकाळी ९ वाजता दाखल झाली डाँ.हेडगेवार चौक येथे आल्या नंतर कुसुम सभागृह येथे विश्रांतीसाठी थांबली होती
या दरम्यान यात्रेतील व उपस्थित पाठींबा देणारे सर्व सामान्य नागरिक याच्या करिता जयराज पॅलेस व अंबिका मंगल कार्यालय येथे भोजनाची सुंदर व्यवस्था केली जवळ पास २० हजार लोकांची व्यवस्था केल्या नंतर कुठेच काही कमी पडू दिली नाही अतिशय सुरेख व्यवस्था झाल्याचे समजले आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सर्व सामन्य व्यक्ती प्रमाणे भोजन करून या व्यवस्थे बद्दल कोतुक चव्हाण परिवाराच्या भोजन व्यवस्थेच्या हातखंड्याचे स्वतः माईक हतात घेऊन तोंड भरून कौतुक केले आहे
याच वेळी दिल्ली,पंजाब,हरियाणा ,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र् येथील सहभागी महिला यांनी भोजन व्यवस्था करणाऱ्या माजी आ.वसंत चव्हाण मित्र मंडळ व प्रा. रवींद्र वसंत चव्हाण यांचे सहकारी यांनी दिवसभर व्यवस्था करून रात्री परत भोजनाची व्यवस्था करून सर्वांची भोजना बरोबर निवासाची व्यवस्था केली.या बद्दल दोहोंचे व चव्हाण यांनी प्रशंसा करत कौतुक केले.

0 Comments