हिमायतनगर नागोराव शिंदे :-
तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद शाळेचा मनमानी करभार. विद्यार्थी उपस्थित पण शिक्षकाची नेहमीच असतें शाळेला दांडी.. विद्यार्थ्यांच्या पालकात असंतोषाची भावना मौजे करंजी येथील जिल्हा परिषद शाळा १२ नोव्हेंबर २०२२:रोजी पूर्ण पणे विध्यार्थी शाळेला आले असताना ही बंद का होती शिक्षक व शिक्षीका यांची शाळेला दांडी कशामुळे होती हे सर्व चित्र पाहायला मिळली त्या प्रसंगी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यानी मुख्याध्यापक राठोड यांच्यावर रोष व्यक्त करून शाळेला कुलूप लावले आहे
शाळेत रजाविना राठोड दांडी मारत आहेत हे चित्र करंजी वासियांना अनेकदा पाहायला मिळाले वरून पालक वर्गातून संताप व्यक्त केल्या जात असून संबंधित शिक्षकाना निलंबित करण्यात यावे ही मागणी पालक वर्गातून करण्यात येत आहे
विद्यार्थ्यांना न शिकवणे सतत खेळायला सोडणे प्रार्थना न घेणे वेळेववर न येणे या सतत दांडी मारणे याच कारणामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळे वरून विश्वास उडत चालला आहे
गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर यांनी या शाळेवर रील शिक्षकांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल घ्यावी अशी पालकांची मागणी आहे शासनाने या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरीफ पठाण यांनी स्वत; शाळेला कुलूप ठोकले याकडे प्रशासन काय भूमिका घेतो नागरीकांचे लक्ष आहे

0 Comments