Header Ads Widget

भैंसा ते उमरखेड बस हिमायतनगर पळसपुर ढाणकी मार्ग सेवा चालू तर हदगाव आगार व्यवस्थापक झोपेत का ? - जनतेचा प्रश्न !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

तेलंगानातून विदर्भाला जोडण्यासाठी नुकतीच भैसा ते उमरखेड दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी साडे दहा वाजता या बसचे पळसपुर येथे आगमन होताच यावेळी बस चालक रोहिदास जाधव,वाहक मुतीमन यांचा सत्कार सेवावृत्त मुख्याध्यापक बाबुराव शिरफुले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नांदेड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर चांदराव वानखेडे पत्रकार शेषराव वाघेकर संजय वाडेकर सतिष वाडेकर भुजंगराव बोबिलवार विठ्ठल गायकवाड बालाजी चिंताकुठे यांच्यासह  काही प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते

सदरची  बस सेवा सुरू करण्यासाठी माधवराव मिटकरी प्रवासी मंडळ ढाणकी यांच्या प्रयत्नाला यश आलेले दिसते कारण या बस सेवेमुळे ढाणकी व्यापार पेठेला हिमायतनगर रेल्वे व भैंसा तेलंगाना इकडे जाण्यासाठी फार सोयीस्कर झाले असून ढाणकी ते हिमायतनगर गांजेगाव पळसपुर मार्गे प्रवास करण्या करीता प्रवाशांचे अक्षरशः हाल होत होते, सदर बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय टळत असून प्रवास्यानि समाधान व्यक्त करताना दिसत आहेत

तेलंगाणा भैंसा आगाराने प्राथमिकता देऊन ही जी बस सेवा सुरू केली. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विदर्भातील उमरखेड ,हदगाव, भोकरआगार निर्णय घेऊन आपली, लालपरी या मार्गावर कधी सोडणार ? याची सुद्धा प्रवाशांना आतुरता लागली आहे.

भैंसा आगारप्रमुख अमृता मोधळकर यांनी उमरखेड बस सेवा सुरू करून, या मार्गावरील प्रवाशांना सुखाची पर्वणीच दिली म्हणावी लागेल. ही बस भैंसा इथून दररोज सकाळी ८ वाजता निघून हिमायतनगर येथे दहा वाजता सुटेल उमरखेडला बारा वाजता पोहोचेल लगेच १२ वाजता उमरखेड हुन वापस भैसा जाईल. तर भैंसा ईथून दुसरी बस दुपारी १.३० वाजता निघेल व उमरखेड येथे अंदाजे साडेतीन, चार वाजेपर्यंत पोहोचून अर्ध्या -----------------

तासाने वापस निघेल. ही बस भैंसा, वाशी, हिमायतनगर, पळसपुर, गांजेगाव, ढाणकी मार्गे उमरखेड येईल व याच मार्गाने वापस जाईल. सर्व प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा व आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments