माधव पवार
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या पद यात्रेच्या निमित्ताने नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गाची संबंधित विभागा कडून मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची बऱ्याच वर्षापासून चाळणी झाले असताना सुद्धा संबंधित विभाग अधिकाऱ्याच्या अनागोंदी कारभारामुळे रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याने जनसामान्य माणसाला या रस्त्यावरून जाताना कमालीचा नाहक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने आणि के.टी कंट्रक्शनच्या बेजबाबदार पणामुळे या महामार्गावर सुद्धा अनेक खड्डे पडले होते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने गवत ही माजले होते परंतु खासदार राहुल गांधी यांच्या पद यात्रेच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी सदरच्या रस्त्यावर काही अडचण येऊ नये म्हणून रस्त्यावरचे अतिक्रमण काढले जागो जागी रंगोटी केल्या रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरी करणात बुजवून घेतले रस्त्याने असलेल्या झाडांना सुद्धा रंगरंगोटी करण्यात आली आहेखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जनता मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन राहुल गांधीला समर्थन दिले आणि तीच जनता ग्रामीण भागातील रस्त्या वरून चालत असताना सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी रस्ते दुरुस्त करण्यासाठी डोळे झाक करत असल्याने कमालीची चर्चा होताना ऐकवयास मिळत असली तरी ग्रामीण भागात झालेल्या रस्त्याची चाळणी झाली हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी सदरचे अधिकारी डोळे झाक करत असल्याने वरचे वर सदरचे रस्ते बेकामी बनले असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून या रस्त्याकडे कोण लक्ष देणार असा ही प्रश्न जनसामान्य माणसातून व्यक्त केला जात आहे

0 Comments