Header Ads Widget

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणतात गेव्हिन व्हिलियम्सन यांचा राजीनामा दु:खी अंतकरणाने स्वीकारला !!



नायगाव फास्ट न्यूज थेट  :- लंडन :- 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळातील गेव्हिन व्हिलियम्सन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार्‍यांना धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला असून या दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानानी राजीनामा स्वीकारत एक बयाण ही जारी केले आहे 
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यांच्या मंत्री मंडळातील गेव्हिन व्हिलियम्सन यांनी ट्रस सरकार मध्ये मंत्रिपद भूषविले होते आणि संरक्षण तसेच शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे  सांभाळली होती त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच त्यांना मंत्री मंडळातुन बरखास्त करण्यात आले त्यांनी आता दुसर्‍यांदा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याच्या नंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केले आहे
ब्रिटनचे गेव्हिन व्हिलियम्सन यांच्या व्यक्ति मत्त्वाबद्दल माहिती असताना सुद्धा त्यांनी पंतप्रधान ऋषीं सुनक यांनी मंत्रि मंडळात स्थान दिल्याची टीका सुनक यांच्यावर करण्यात येत होती याच दरम्यान आपण दु:खी अंतकरणाने हा राजीनामा स्वीकारला असून या अगोदरच्या सरकारां मध्ये सुद्धा व्हिलियम्सन यांचे महत्त्वाचे योगदान होते परंतु विरोधक सरकारच्या चांगल्या कामां वरून लक्ष हटवत असल्याचे दिसून येत असल्याचे सुनक यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments