माधव पवार
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नांदेड येथे दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीचे जंगी स्वागत करण्यात आले असल्याची माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले असून सदरच्या नेत्यांचे आगमन नांदेड मध्ये होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वागत केले आहे
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराट्रात काल परवाच क्रांतीची मशाल घेऊन देगलूर येथे आली आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी सदरच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन खासदार राहुल गांधी यांच्या मोठया प्रमाणात समर्थन करीत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले असून सदरच्या भारत जोडो यात्रेच्या लक्षवेधी संख्या बळामुळे नक्की देशात काँग्रेसची सत्ता येणार आहे
नांदेड येथे काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री मा. जितेंद्र आव्हाड नांदेडच्या विमान तळावर आगमन होताच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे नांदेड विमानतळावर स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे सह असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments