विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे / माधव पवार -
मोदींच्या स्वार्थी धोरणाने महाराष्ट्र राज्याचे उद्योग प्रकल्प गुजरात मध्ये पळवून नेण्याचे देशातील केंद्र सरकारने निवडणुकीसाठी केलेले पाप असून, अश्या मोदींच्या स्वार्थी धोरणाची जनतेला माहिती देण्यासाठी आपण ही पदयात्रा काढली असून तळागाळातील शेतकरी युवक, श्रमिक,यांच्या सुख दुःखात सामील होण्याची संधी मला पदयात्रेने मिळाली असे विचार खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
ते एम आय डी सी कुष्णुर ता.नायगाव येथे बुधवारी सायंकाळी भारत जोडो निमित्ताने कॉर्नर सभेला सबोधताना बोलत होते.ते पुढे म्हणाले पद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा व श्रमिकांच्या भारताला समजून घेण्याची संधी रस्त्यावर उतरल्याने मला मिळाली.राज्याची हालत रस्त्यावरून चालताना समजते असे त्यांनी राज्य सरकारच्या धोरणा वरून टीका करताना बोलत होते
""""""""""राहुल गांधी प्रेस वर भडकले """"""""""
प्रेस ची मित्र मंडळी विरोधी पक्षाचे काहीच दाखवत नाही याबद्द जाहीर सभेत मीडियाच्या बद्दल खा. राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला.मीडिया च्या बाबद त्यांनी व्यक्त केलेल्या खेदाबद्दल उपस्थित जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत होता.हे पाहून राहुलनी आमचा आवाज हुकूम शाही मोदी सरकार सभागृहात ही दाबत असल्याचा आरोप केला.यावर मीडिया गप्प बसते याचा अर्थकारण जोर धरत आहे असा जाहीर आरोप करून देशाच्या मीडिया वर शिंतोडे उडवून राहुलनी आपले मत प्रगट केले.
मोदी सरकारच्या जी.एस.टी.व नोट बंदीच्या धोरणा मुळे सुनामीच्या लाटे प्रमाणे देशाचा युवक रोजगाराच्या शोधात परफटत गेला असून देशाच्या शेतकरी,व्यापारी यांची मोदींच्या या निर्णयाने वाट लावली आहे.काही मोजक्या मोठ्या व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करून देशातील शेतकर्या सह सर्व सामान्य नागरिकांना देशोधडीला लावणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून सर्वांनी यासाठी तयार राहावे असे मत भारत जोडो यात्रे दरम्यान बुधवारी सायंकाळी कुष्णुर एम. आय. डी.सी. ता.नायगाव येथे बोलताना खा.राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
कन्याकुमारी ते काश्मीर ३५०० की.मी.चालण्या साठी महाराष्ट्राच्या जनतेनी दिलेली शक्ती व सर्वांच्या अलोट प्रेमा मुळे ही यात्रा उत्साह पूर्ण वातावरनात कन्याकुमारी ते काश्मीर चालत असून भारताचा तिरंगा ही देशाची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व पायी चालत आहोत आपणा सर्वांची ऊर्जा स्रोत या मुळेच ही भारत जोडो यात्रा आज निघाल्या सारखी ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे.असे ते म्हणाले.
कुष्णुर ता नायगाव येथे ही यात्रा बुधवारी सायंकाळी सात वा आली..या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदीने सभेला संबोधित केले.काँग्रेसचे के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पटेल,खा.रजनी ताई पाटील,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नसीम खान,माणिकराव ठाकरे,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,भाई जगताप,विजय वडेट्टीवार,राष्ट्रवादी आ.बाळासाहेब जाधव, माजी आ.वसंतराव चव्हाण डी.पी.सावंत ,संजय बेळगे,विजय चव्हाण,श्रीनिवास चव्हाण,हणमंत चव्हाण यांच्या सह राज्य व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी,लोकप्रतिनिधी या सभेत हजर होते.
सभे पूर्वी खा. राहुल गांधी यांचे स्वागत जिल्हा बँक अध्यक्ष माजी आ.वसंत चव्हाण माजी सभापती संजय बेळगे यांनी महात्मा बसवेशवर यांची प्रतिमा देऊन स्वागत केले मनोज मोरे,बालाजी मदेवाड,प्राचार्य मनोहर पवार,सरपंच जाधव,आदीने ही स्वागत केले. सभेचे प्रास्ताविक रवींद्र चव्हाण यांनी केले संचलन उद्धव ढगे यांनी तर आभार प्रा रवींद्र वसंत चव्हाण यांनी मानले.
नायगाव ते कुष्णुर पदयात्रेत कुंटुर बरबडा सर्कल्च्या कार्यकर्त्यांनी जागो जागी स्वागत केले तर उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेश भया यांनी २५ संबळ वाद्य ताफा यांचे वाद्य वाजवून स्वागत केले.तर बरबडा विभागाचे मनोज मोरे,बालाजी मदेवाड ,प्राचार्य मनोहर पवार,माधव कहळेकर,शिवाजी धर्माधिकारी यांनी गगणबीड पाटी येथे रांगोळी काढून वाघ्या मुरळी नृत्य संचाने स्वागत केले

0 Comments