विशेष नायगाव प्रतिनिधी :- बाळासाहेब पांडे -
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील रहिवासी असलले संजय बियाणी स्व.संजय बालाप्रसादजी बियाणी यांच्या जयंती निमित्त कोलंबी केंद्रातील २२ शाळा मध्ये शालेय साहित्य व वाचनालयास पुस्तके वाटप कार्यक्रम याचा शुभारंभ दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शनिवार सकाळी ठिक- साडे नऊ वाजता कोलंबी तालुका नायगाव येथे करण्यात आला आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोलंबी, श्री शंकरराव चव्हाण हायस्कुल कोलंबी, राजमाता इंग्लिश स्कुल कोलंबी,अंगणवाडी क्रमांक १,२,३,४,५, व अमरज्ञान सार्वजनिक वाचनालय कोलंबी येथे स्व.संजय बालाप्रसादजी बियाणी यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य व वाचनालयास पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत
कोलंबी परिसरातील व गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन.प्रवीण बियाणी, राज बियाणी व समस्त गावकरी मंडळ कोलंबी.तालुका नायगांव (खै) जि.नांदेड यांनी केले आहे.

0 Comments